Corona patients Dainik Gomantak
देश

दिल्लीत कोरोनाचा वेग अनियंत्रित, 24 तासांत 17 हजारांहून अधिक रुग्ण

'येत्या 10 दिवसांत दिल्ली आणि मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उच्चांक असेल'

दैनिक गोमन्तक

नवी दिल्लीत 24 तासांत कोरोना विषाणूचे 17335 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात संसर्गाचे प्रमाण आता 17.73 टक्क्यांवर पोहोचले आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे 9 मृत्यूही झाले आहेत. त्याच वेळी, रुग्णांची संख्या 39873 वर पोहोचली आहे. कानपूर आयआयटीचे (IIT) प्रोफेसर डॉ. मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटले आहे की, येत्या 10 दिवसांत दिल्ली आणि मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उच्चांक असेल. त्यांनी सांगितले की, दोन्ही शहरांमध्ये सुमारे 30,000 ते 50,000 कोरोना रुग्ण आहेत.

डॉ अग्रवाल यांच्या मते, या महिन्याच्या अखेरीस भारतात कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचेल. एका दिवसात 4 ते 8 लाख नवीन प्रकरणे समोर येतील. ते म्हणाले की, मार्चअखेर भारतात दररोज 10 हजार ते 20 हजार नवीन कोरोना रुग्णांची शक्यता आहे. डॉ अग्रवाल म्हणाले की, रुग्णालयात कमी कोरोना (Corona) रुग्ण दाखल होतील अशी अपेक्षा आहे. रुग्णालयांमध्ये खाटा वाढवण्याचे आदेश कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली सरकारने (Government) आपल्या नऊ रुग्णालयांमध्ये कोविड खाटा सध्याच्या 3,316 वरून 4,350 पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT