Control of the judiciary by the central government Rahul Gandhi attacks Modi government
Control of the judiciary by the central government Rahul Gandhi attacks Modi government 
देश

केंद्र सरकारचे न्यायव्यवस्थेवर नियंत्रण; राहुल गांधीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

गोमंतक वृत्तसेवा

मल्लापुरम : देशभरात कृषी कायद्यावरुन राजकिय वातावरण तापलं असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर न्यायव्य़स्थेच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार स्वत:ची  इच्छा आणि ताकद न्यायव्यवस्थेवर लादत आहे. देशातील न्यायपालिकेने जे करणं आवश्यक आहे, ते सरकारकडून करु दिले जात नाही. न्यायपालिकेवर मोदी सरकारचे नियंत्रण आहे,असा घणाघात राहुल यांनी मोदी सरकरावर केला.

राहुल गांधी यांची केरळमधील मल्लापुरममध्ये सभा झाली. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला,‘’दिल्लीतील मोदी सरकार न्यायालयावंर आपल्य़ा इच्छा आणि ताकद लादत आहे. जे त्यांना करणे आवश्यक आहे ते त्यांना मोदी सरकारकडून करु दिले जात नाही. ते फक्त न्य़ायपालिकेच्या बाबतीत नाही तर ते लोकसभा आणि राज्यसभेतही चर्चा करु दिले जात नाही. निवडणूक जिंकणं म्हणजेच हरणं आणि हरणं म्हणजेच जिकणं असे देशात पहिल्यांदाच घडत आहे,’’ असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला.

देशात कृषी काय़द्याचा वाढता विरोध, कोरोनाच्या वाढत्या केसेस, पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीवरुन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असतानाच प्रथमच राहुल यांनी न्यायवस्थेवरुन मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT