Pulwama

 

Dainik Gomantak

देश

शहीद जवानाच्या बहीणीच्या लग्नाला पोहोचली भारतीय जवानांची तुकडी

पुलवामा हल्ल्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेले शैलेंद्र प्रताप सिंग यांच्या बहिणीच्या लग्नाला सीआरपीएफ जवानांच्या एका गटाने हजेरी लावली.

दैनिक गोमन्तक

गेल्या वर्षी पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंग (Shailendra Pratap Singh) यांच्या बहिणीच्या लग्नाला सीआरपीएफ जवानांच्या एका गटाने हजेरी लावली होती. कर्तव्य बजावताना शहीद झाले तेव्हा ते केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 110 व्या बटालियनमध्ये तैनात होते. कॉन्स्टेबल सिंगचे सहकारी उत्तर प्रदेशमध्ये त्याची बहीण ज्योतीच्या लग्नात पोहोचले आणि वधूच्या भावांना सोपवलेली सर्व कर्तव्य जवानांनी पार पाडली.

CRPF ने ट्विटरवरती शेअर केलेले फोटो दाखवतात की 'गणवेशातील जवान' वधूला मंडपापर्यंत घेऊन जात आहेत, हे काम सामान्यतः भाऊ करतात. “मोठे भाऊ म्हणून, सीआरपीएफचे जवान सीटी शैलेंद्र प्रताप सिंग यांच्या बहिणीच्या लग्न समारंभाला उपस्थित होते,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे. 110 Bn CRPF चे Ct शैलेंद्र प्रताप सिंग यांनी 05/10/20 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला शौर्याने प्रत्युत्तर देताना सर्वोच्च बलिदान दिले आहे.

“माझा मुलगा आता या जगात नाही पण आता आमच्याकडे सीआरपीएफ जवानांच्या रूपात अनेक मुले आहेत जे नेहमी सुख-दु:खाच्या वेळी आमच्या पाठीशी उभे राहतात,” शैलेंद्र प्रताप सिंग यांचे वडील म्हणाले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, सीआरपीएफ जवान श्रीनगरच्या (Srinagar) बाहेरील एका महामार्गावर कर्तव्य बजावत असताना शैलेंद्रयांच्यावरती दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.

या हल्ल्यात सीआरपीएफचे किमान दोन जवान शहीद झाले असून पाच जखमी झाले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांसह सीआरपीएफचे जवान 5 ऑक्टोबर रोजी पंपोर बायपासवर रस्ता उघडण्याचे ऑपरेशन करत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. "जेकेपीसह 110 बटालियन सीआरपीएफचे जवान ROP करत होते, त्या दरम्यान अज्ञात दहशतवाद्यांनी (12:50 तास) जवानांवर गोळीबार केला. या घटनेत एकूण 05 सीआरपीएफ जवान जखमी झाले आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT