Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Twitter Bio: राहुल गाधींनी खासदारकी गमावल्यानंतर ट्विटर बायोमध्ये केला मोठा बदल

लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी करून राहुल गांधी यांचे खासदारकी रद्द केली आहे.

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi Twitter Bio:  काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना त्यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल मानहानी केल्याबद्दल दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द केली आहे.   दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये मोठा बदल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा बायो अपडेट केला असून त्यात 'अपात्र लोकसभा सदस्यत्व' असे लिहिले आहे.

हे नेते 'संकल्प सत्याग्रहा'त सहभागी होणार

दिल्लीतील राजघाटावर आयोजित 'संकल्प सत्याग्रहा'मध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा आणि इतर अनेक काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल गांधी देशातील जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर लढत आहेत. 

त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. कोलार (कर्नाटक)चे प्रकरण सुरत येथे आणले आहे. हिम्मत असती तर हेच प्रकरण करून दाखवले असते. ते पुढे म्हणाले, राहुलला गप्प करण्यासाठी हे सर्व केले गेले आहे. राहुल गांधी हे खंबीर व्यक्ती आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, चोराला चोर म्हणणे चुकीचे असेल, तर काँग्रेस पुन्हा पुन्हा हीच चूक करेल. पंतप्रधान मोदी त्यांचा मित्र अदानी यांना कशी मदत करतात हे राहुल गांधी लोकसभेत उघड करणार होते, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, हा निर्णय भाजपने घेतला आहे. यामध्ये केवळ न्यायालयाचे नाव पुढे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT