Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: 'हिंसा घडवून आणतात PM मोदी...', राहुल गांधींचा श्रीनगरमध्ये हल्लाबोल

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेच्या समारोपप्रसंगी ते म्हणाले की, 'पीएम मोदी, अमित शहा आणि अजित डोवाल हिंसा घडवून आणतात.

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi Attacks PM Narendra Modi: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला.

भारत जोडो यात्रेच्या समारोपप्रसंगी ते म्हणाले की, 'पीएम मोदी, अमित शहा आणि अजित डोवाल हिंसा घडवून आणतात. पीएम मोदी, अमित शहा आणि आरएसएसच्या लोकांनी हिंसा पाहिली नाही. त्यांना भीती वाटते. भाजपचा कोणताही नेता पायी चालू शकत नाही, याचे कारण जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरु देणार नाहीत.'

राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) प्रशासनाने सांगितले की, तुम्ही पायी चालात आहात तुमच्यावर हल्ला होऊ शकतो. तेव्हा मी विचार केला की, माझा द्वेष करणाऱ्यांना संधी का देऊ नये, जेणेकरुन ते माझा पांढरा टी-शर्ट लाल करु शकतील. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये मला ग्रेनेड मिळाले नाहीत.'

यादरम्यान राहुल गांधींनी (Rahul Gandhi) एक किस्साही सांगितला. ते म्हणाले की, मी शाळेत असताना शिक्षक म्हणाले – राहुल, तुला मुख्याध्यापकांनी बोलावले आहे. मुख्यध्यापक म्हणाले- राहुल, तुझ्या घरुन फोन आला आहे... हे शब्द ऐकून माझे पाय थरथरु लागले आणि मला समजले की, काहीतरी गडबड झाली आहे. मी फोन कानाला लावला तेव्हा तिकडून आवाज आला की, आजीला गोळी लागली आहे'

राहुल पुढे असेही म्हणाले की, 'मी यात्रेत फिरत असताना मला अनेक महिला दिसल्या. त्यांच्यापैकी काहींनी आपल्यावर बलात्कार आणि छळ झाल्याचे भावनिकरित्या सांगितले. त्यावर मी त्यांना विचारले की, पोलिसांकडे तक्रार केली का, तेव्हा त्या म्हणाल्या नाही, यामुळे आमचे नुकसान होईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT