Sukhpal Khaira Arrest Dainik Gomantak
देश

Drug Case: ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक, राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई...

Sukhpal Khaira Arrest: अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत पंजाब पोलिसांनी आज (गुरुवारी) काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना अटक केली.

Manish Jadhav

Sukhpal Khaira Arrest: अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत पंजाब पोलिसांनी आज (गुरुवारी) काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना अटक केली. पहाटे पोलिसांनी सुखपाल खैरा यांच्या चंदिगड येथील घरावर छापा टाकून खैरा यांना अटक केली.

यावेळी पोलीस आणि काँग्रेस आमदार खैरा यांच्यात जोरदार वादावादी झाली. खैरा यांनी सीएम भगवंत मान यांच्यावर आरोप करत म्हटले की, भगवंत मान हे वैर दाखवत आहेत. आता याप्रकरणी पंजाब सरकारचे वक्तव्यही समोर आले आहे.

अटकेबाबत पंजाब सरकारचे विधान

काँग्रेस (Congress) आमदार खैरा यांच्या अटकेबाबत विधान करताना पंजाब सरकारने सांगितले की, '2015 च्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी पुराव्याच्या आधारे कारवाई केली.

सत्र न्यायाधीशांच्या आदेशानुसार एसआयटीची स्थापना करण्यात आली. पंजाब पोलिसांचे डीआयजी स्वपन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही टीम तयार करण्यात आली होती. एसआयटीच्या तपासात अमली पदार्थांच्या तस्करीत त्यांच्या सहभागाचे पुरावे मिळाले आहेत.'

असा आरोप सुखपाल खैरा यांनी केला

दरम्यान, ड्रग्स तस्कर गुरदेव सिंगला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरदेव सिंग हा सुखपाल खैरा यांचा निकवर्तीय असल्याचे सांगितले जाते. सुखपाल यांना राजकीय संरक्षण देऊन वाचवले जात होते.

विशेष म्हणजे, आता पंजाबचे (Punjab) काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर आरोप करत त्यांच्याविरोधात शत्रुत्व निर्माण केले जात असल्याचे सांगितले. ही अटक जुन्या एनडीपीएस प्रकरणात करण्यात आली आहे.

पंजाब काँग्रेस प्रमुखांचे मोठे वक्तव्य

दरम्यान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग म्हणाले की, राजकीय सूडबुद्धीने पंजाब काँग्रेसचे आमदार सुखपाल खैरा यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे, हा विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न आहे आणि मुख्य मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्याचा पंजाबच्या आप सरकारचा डाव आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT