12 crore cash recovered MLA Dainik Gomantak
देश

12 कोटी कॅश, 6 कोटींचे दागिने, १ कोटी परकीय चलन आणि अलिशान कार; काँग्रेस आमदाराला अटक, गोव्यात केली होती छापेमारी

ED Arrested KC Veerendra: ईडीने वीरेंद्र यांच्या ३० ठिकाणी छापे टाकले आणि त्यानंतर १७ बँक खाती आणि दोन बँक लॉकर गोठवले आहेत.

Pramod Yadav

तपास यंत्रणा ईडीने कर्नाटकचे काँग्रेस आमदार के.सी वीरेंद्र यांना अटक केली आहे. २२ आणि २३ ऑगस्ट रोजी ईडीने के.सी वीरेंद्र यांच्या बेंगळुरू, हुबळी, मुंबई, जोधपूर, गोवा येथील अनेक मालमत्तांवर छापे टाकले. गोव्यात केसी वीरेंद्र यांच्या पाच कॅसिनोवर छापे टाकण्यात आले. के. सी अनेक ऑनलाइन बेटिंग साइट्स चालवत असल्याचे तपासातून समोर आले आहे.

छाप्यादरम्यान ईडीने काँग्रेस आमदाराच्या जागेतून १२ कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. यामध्ये १ कोटी रुपयांचे परकीय चलन समाविष्ट आहे आणि अनेक आलिशान वाहने देखील सापडली आहेत. याशिवाय सुमारे ६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १० किलो चांदी देखील सापडली आहे.

ईडीनकडून ३० ठिकाणी छापे

गंगटोकमधून आमदार के. सी वीरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे. के. सी त्यांच्या काही साथीदारांसह कॅसिनोसाठी जमीन भाड्याने देण्यासाठी गंगटोकला गेले होते, अशी माहित समोर आली आहे.

ईडीने वीरेंद्र यांच्या ३० ठिकाणी छापे टाकले आणि त्यानंतर १७ बँक खाती आणि दोन बँक लॉकर गोठवले आहेत. वीरेंद्रचा भाऊ के.सी नागराज आणि त्याचा मुलगा पृथ्वी एन. राज यांच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वी ईडीने कर्नाटकातील आणखी एक काँग्रेस आमदार सतीश कृष्णा साईल यांच्या घरावर आणि परिसरात छापेमारी करण्यात आली तेथेही तपास यंत्रणेला बेहिशेबी संपत्ती सापडली होती. ईडीने छाप्यादरम्यान १.७ कोटी रुपये आणि ६.८ किलो सोने जप्त केले. कृष्णा साईल हे कारवार-अंकोला मतदारसंघाचे आमदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT