Hardik patel Dainik Gomantak
देश

काँग्रेस हा जातीयवादी पक्ष - हार्दिक पटेल

हार्दिक पटेल यांनी भाजपात प्रवेशाच्या अफवा फेटाळल्या

Sumit Tambekar

गुजरात येथील नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. यावर काँग्रेसने हार्दिकवर मागील 6 वर्षांपासून भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप केला आहे. यानंतर आता हार्दिक पटेलने काँग्रेसवर पलटवार करत काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप केला आहे. अहमदाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Congress is a racist party - Hardik Patel)

गुजरातमध्ये वर्षाअखेर विधानसभा निवडणुका होणार असताना काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. कारण पटेल यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली होती. तरी ही त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असुन राज्य युनिटच्या कार्यकारी अध्यक्षांनी त्यांना कोणतीही कर्तव्ये न सोपवली नाही. कार्याध्यक्षांच्या जबाबदाऱ्या केवळ कागदावर आहेत. मला दोन वर्षे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही.” असा आरोप यावेळी केला आहे.

यावेळी पुढे बोलताना हार्दिक पटेल यांनी भाजपात प्रवेशाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रदेश काँग्रेस नेत्यांबरोबरच शीर्ष नेतृत्वालाही लक्ष्य केले.

‘‘गुजरात आणि गुजरातींबद्दल द्वेष असल्यासारखे पक्षाच्या नेतृत्वाचे वर्तन होते. मी अनेकदा गुजरातमधील समस्यांकडे नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा-जेव्हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून काही मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाइलवर अधिक लक्ष असल्याचे आढळले. असे ही ते यावेळी म्हणाले.

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिला पक्षाचा राजीनामा

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मी भविष्यात गुजरातसाठी सकारात्मक पद्धतीने काम करू शकेन, असे ट्विट पटेल यांनी लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT