Karnatak CM Siddaramaiah  Dainik Gomantak
देश

Bengaluru Rameshwaram Cafe Blast: रामेश्वरम कॅफेत बॅग ठेवणारा सीसीटीव्हीत कैद; IED बॉम्ब स्फोट असल्याचा सिद्धरामय्यांकडून खुलासा

Karnatak CM Siddaramaiah: त्याचबरोबर सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी पुष्टी केली की, बंगळुरुच्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेला हा स्फोट नसून बॉम्बस्फोट आहे.

Manish Jadhav

Rameshwaram Cafe Blast Video: बंगळुरुमधील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटाने खळबळ उडाली. या स्फोटात 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्फोटाला दुजोरा देताना सांगितले की, कॅफेमध्ये कोणीतरी बॅग सोडली होती. कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचे सीसीटीव्ही समोर आले असून, पोलीस त्याचा तपास करत आहेत. बंगळुरुच्या राजाजीनगरमध्ये रामेश्वरम नावाचा प्रसिद्ध कॅफे आहे. रोजच्याप्रमाणेच आजही (शुक्रवारी) कॅफेमध्ये लोकांची गर्दी होती. कॅफेचे कर्मचारीही उपस्थित होते. दुपारी एकच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात कॅफे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या स्फोटात आतापर्यंत 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

रामेश्वरम कॅफे स्फोटाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, कॅफेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. कोणीतरी बॅग कॅफेच्या आत सोडल्याचे निष्पन्न झाले. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. ते पुढे म्हणाले की, हा आयईडी स्फोट असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी तपास करण्यात येत आहे. दरम्यान, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री कॅफेकडे जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अशाप्रकारचा स्फोट झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शहरातील कुंदनहल्ली परिसरात हा अपघात झाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॅफे शहरातील कुंदनहल्ली भागात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले आहेत. दरम्यान, स्फोटाचा आवाज ऐकून प्रत्यक्षदर्शी घाबरले. हॉटेलजवळ आग आणि धुराचे लोट दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी कॅफे मालकाला भेटले

दुसरीकडे, रामेश्वरम कॅफेमध्ये झालेला स्फोट हा सुनियोजित कट असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चा (बीजेवायएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी शुक्रवारी केला. भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी कॅफे मालकाला भेटल्याचे सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी ही माहिती दिली. सूर्या यांनी हे 'बॉम्बस्फोटाचे प्रकरण' असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, हा स्फोट एका ग्राहकाने ठेवलेल्या बॅगमुळे झाला असून सिलिंडरच्या स्फोटामुळे नाही. कॅफेतील एक कर्मचारीही जखमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT