cm shivraj came on the road with a handcart got 10 truck goods and 2 crore rupees in 3 hours Dainik Gomantak
देश

मुख्यमंत्री शिवराज हातगाडी घेऊन रस्त्यावर, 3 तासात मिळाला 10 ट्रक माल आणि 2 कोटी रुपये

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अंगणवाडीतील मुलांसाठी खेळणी गोळा करण्यासाठी भोपाळच्या रस्त्यावर उतरले. अशोका गार्डन परिसरात ते स्वत: हातगाडी घेऊन सर्वसामान्यांमध्ये जाऊन अंगणवाड्यांसाठी खेळणी व इतर वस्तू आणल्या. जनतेला पाठिंबा देत खेळणी, क्रीडासाहित्य, टीव्ही स्क्रीन, कुलर, वॉटर कॅम्पर, भांडी, गालिचे असे साहित्य मुख्यमंत्री शिवराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सीएम शिवराज फुलांनी सजवलेल्या हातगाड्यांसह खेळणी गोळा करण्यासाठी चालले होते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले लोक मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा देत होते.(cm shivraj came on the road with a handcart got 10 truck goods and 2 crore rupees in 3 hours)

तसेच त्यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांना खेळण्यांसह जीवनावश्यक वस्तू देत होते. मुख्यमंत्री शिवराज यांनी सांगितले की, या मोहिमेबद्दल लोकांचा उत्साह इतका होता की, मला 800 मीटरचे अंतर कापण्यासाठी 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. सामान घेताना माझे हात थकले. अंगणवाड्यांसाठी सुमारे 10 ट्रक माल पोहोचला आहे. जे भोपाळ जिल्ह्यातील 1800 अंगणवाडी केंद्रांमध्ये वितरित केले जाईल.

अंगणवाड्यांसाठीच्या सामानाव्यतिरिक्त सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम आली आहे. तसेच, लोकांनी मोठ्या प्रमाणात अंगणवाड्या दत्तक घेण्याची हमी दिली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करून या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. अंगणवाड्यांसाठी 1 कोटी रुपये आणि 50 अंगणवाड्या दत्तक देण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी आणि कवी कुमार विश्वास यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT