Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

'ED, CBI च्या अधिकाऱ्यांविरोधात मी चौकशी सुरु करेन', ममतांची केंद्राला धमकी

West Bengal Chief Minister Mamata Banerjee: बंगालमध्ये तैनात असलेल्या केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरु करण्याची धमकी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

West Bengal Chief Minister Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांच्या वाढत्या छाप्यांवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये तैनात असलेल्या केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरु करण्याची धमकी त्यांनी दिली आहे. पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या एका रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, "माझ्याकडेही बंगालमध्ये सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय अधिकार्‍यांवर खटले आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या अधिकार्‍यांना दिल्लीत बोलावले, तर मी तुमच्या अधिकार्‍यांना कोलकातामध्ये बोलावेन."

ममता पुढे म्हणाल्या की, ''राज्यात नियुक्त केलेल्या आठ केंद्र सरकारच्या (Central Government) अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. केंद्राने आमच्या माणसांना सीबीआयच्या माध्यमातून अटक केली आहे. मी प्रत्येक गोष्टीची दखल घेत आहे." ममता पुढे असेही म्हणाल्या की, 'TMC बिल्किस बानो प्रकरणात गुंतलेल्यांवर कारवाई करण्यासाठी कोलकातामध्ये (Kolkata) 48 तासांचे दीर्घ धरणे आंदोलन करेल, ज्यांना यापूर्वी गुजरात सरकारने सोडले आहे.'

नुकतेच, हकीम यांना केंद्रीय यंत्रणांनी समन्स बजावले होते. हकीम यांच्या अटकेचा निषेध करत बॅनर्जी म्हणाल्या, "जर त्यांना अटक झाली तर याद राखा. निवडून आलेली सरकारे पाडण्यासाठी भाजपला (BJP) हजारो कोटी रुपये कुठून मिळतात? 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागणार आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT