planes Dainik Gomantal
देश

India-China Row: चीनी विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी

चीनने LAC वर पुन्हा एकदा घुसखोरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

India-China Row: चीनने LAC वर पुन्हा एकदा घुसखोरी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे विमान एलएसीवरील नो फ्लाय झोनमध्ये घुसले आहे. चीनची लढाऊ विमाने 10 किमी आत आली. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमध्ये चिनी लढाऊ विमाने दिसली. चीनच्या कारवाया पाहता भारतीय हवाई दलही सतर्क झाले आहे.

दरम्यान, चीनची (China) लढाऊ विमाने सातत्याने असे उल्लंघन करत आहेत. गेल्या एक महिन्यापासून चीन सातत्याने अशाप्रकारची घुसखोरी करत आहे. यापूर्वी भारतीय हवाई दल प्रमुखांनीही चीनकडून अशी घुसखोरी केली जात असल्याचे वक्तव्य केले होते. भारत (India) आणि चीनमधील लष्करी पातळीवरील चर्चेदरम्यान चीन सातत्याने अशा कारवाया करत आहे.

दुसरीकडे, चीनकडून अशी कोणतीही कारवाई झाल्यास त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारतीय हवाई दलाकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने पूर्व लडाखमध्ये पूर्णपणे सक्रिय आहेत. त्याचवेळी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले की, 'चीनकडून केल्या जात असलेल्या कारवायांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT