china 
देश

चीनला नको आहे भारताचा अडथळा

Dainik Gomantak

वॉशिंग्टन

भारताचे आव्हान मर्यादित ठेवणे आणि भारत-अमेरिका मैत्रीमध्ये बाधा आणणे, हे चीनचे दक्षिण आशियातील प्राथमिक ध्येय असल्याचा दावा अमेरिकेमधील हडसन इन्स्टिट्यूटमधील विचारवंतांनी काढला आहे. चीनने भारतात केलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर या गटाच्या मताला महत्त्व आहे.
‘कोरोना संकटाच्या काळातील अमेरिका आणि चीनमधील स्पर्धा’ या नावाने हडसन इन्स्टिट्यूटने अहवाल प्रसिद्ध केला असून, यामध्ये चीनची पाकिस्तानमधील गुंतवणूक, भारताबरोबरील वाद, श्रीलंकेशी निर्माण झालेली जवळीक यांचा आढावा घेण्यात आला आहे. या अहवालानुसार, अमेरिकेच्या आखात आणि हिंदी महासागरातील अस्तित्वाला शह देण्याच्या उद्देशाची पूर्ती करण्याचा दक्षिण आशिया हा एक मार्ग असल्याचे चीनने ठरविले आहे. त्यासाठी चीन कोरोना साथीचा वापर स्वत:ला राजकीय, व्यूहात्मक आणि आर्थिक फायदे मिळविण्यासाठी करत आहे. दक्षिण आशियातील भारताचे आव्हान मर्यादित ठेवणे आणि भारत-अमेरिका मैत्रीला अडथळा आणणे, हे त्यांचे प्राथमिक ध्येय आहे, असे अहवालात म्हटले आहे. दक्षिण आशियात चीनला खरे आव्हान भारताचेच आहे, असेही या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.
‘दक्षिण आशियात वर्चस्व वाढवायचे असेल तर चीनला भारताकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. चीन हा आपल्यापेक्षा बलवान नसून तोडीचा आहे, अशीच भारताची कायम भूमिका राहिली आहे. चीनने केलेल्या घुसखोरीमुळे भारत अस्वस्थ आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. यात वाढ झाल्यास भारताला अर्थातच अमेरिका आणि जपानसारख्या मित्रांची मदत लागेल,’ असे अहवालात म्हटले आहे.

भारताला मदत करणे अपरिहार्य
अहवालानुसार, प्रादेशिक सुरक्षा पुरविण्याची भूमिका भारताने निभवावी, असे अमेरिकेला वाटत असल्यास आणि जागतिक पुरवठा साखळीची फेरबांधणी करून चीनवरील अवलंबित्व कमी करायचे असल्यास तर भारताची आर्थिक आणि लष्करी ताकद वाढविण्यास मदत करणे अमेरिकेला अत्यावरश्‍यक आहे. चीनमधून बाहेर पडणाऱ्या अमेरिकी आणि जपानी कंपन्या भारतामध्ये व्यवसाय करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT