मुलांचे लसीकरण

 

Dainik Gomantak

देश

भारतात लवकरच मुलांचे लसीकरण होणार...

मुलांचेसाठी सहा महिन्यांत लस आणू. ही लस तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी उपलब्ध असावी, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ (CEO) पूनावाला यांनी सांगितले की, पुणेस्थित लस निर्माता कंपनी पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी कोरोनाव्हायरस (Corona) लस लॉन्च करण्याची योजना आखत आहे. पूनावाला यांनी अधोरेखित केले की जी लस मुलांसाठी तयार केली जाईल ती नोव्हावॅक्स या अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी (American Biotechnology) कंपनीची कोविड-19 लस असेल. कोवोव्हॅक्स या नावाने त्यांची कंपनी स्थानिक पातळीवर तयार करेल, असे त्यांनी सांगितले.

पूनावाले म्हणाले की, आम्ही मुलांमध्ये गंभीर आजार पाहिलेला नाही. सध्या मुलांची काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र, आम्ही त्यांच्यासाठी सहा महिन्यांत लस आणू. ही लस तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी उपलब्ध असेल.

तसेच, या लसीची चाचणी सुरू आहे. लसीने तीन वर्षांच्या वयोगटापर्यंत सर्व बाबतीत उत्कृष्ट डेटा दर्शविला आहे. ही लस येत्या सहा महिन्यांत लाँच केली जाईल. जगातील अनेक देशांमध्ये लहान मुलांना लस दिली जाईल.

Zydus Cadila च्या ZyCoV-D लस मंजूर

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने आणीबाणीच्या वापराच्या अधिकृततेसाठी (EUA) दिलेली एकमेव लस ही 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी करण्यात आलेल्या लसींपैकी एक आहे. ही लस अहमदाबाद येथील Zydus Cadila ची ZyCoV-D लस आहे. मात्र, आतापर्यंत या लसीचा देशाच्या लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आलेला नाही. DCGI च्या तज्ञ पॅनेलने 12-18 वयोगटासाठी हैदराबादस्थित भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडकडून कोवॅक्सीनची शिफारस केली आहे. मात्र, अंतिम मंजुरी देण्यापूर्वी कंपनीकडून अतिरिक्त माहिती मागवण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT