CDS Bipin Rawat Dainik Gomantak
देश

सीडीएस बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर क्रॅश

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात सीडीएस बिपिन रावत देखील उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे.

Manish Jadhav

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) देखील उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत तीन जवानांना वाचवण्यात यश आले आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नी होते. तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्वांना उपचारासाठी वेलिंग्टन तळावर नेण्यात आले आहे. चौथ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत आपल्या पत्नीसोबत उटी येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र हा अपघात कुन्नूरच्या घनदाट जंगलात घडला आहे. लष्कराने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. हे हेलिकॉप्टर एमआय सीरीजचे होते. सीडीएस बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि काही कुटुंबीय जहाजावर होते. स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत आहेत. हा परिसर दाट असल्याचे सांगण्यात येत आहे. इथे आजूबाजूला घनदाट झाडी आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आजूबाजूला आगीच्या ज्वाला दिसत होत्या. पोलिसांसह लष्कर आणि हवाई दलाचे जवान बचावकार्यासाठी पोहोचले आहेत. आजूबाजूच्या परिसरातही शोधमोहीम सुरु आहे. एमआय-सीरीज हेलिकॉप्टरने सुलूर लष्करी तळावरुन उड्डाण केले, काही वेळातच ते निलगिरीमध्ये कोसळले. ते वेलिंग्टन डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटकडे जात होते. स्थानिक टीव्ही चॅनेलवरील अपघातस्थळाच्या छायाचित्रांमध्ये हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यासह प्रचंड धूर आणि आग दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

BJP MGP Alliance: गोव्यात भाजप-मगो युती निश्चित; पण जागावाटपाचा फैसला दिल्ली दरबारी!

Shivaji Maharaj Statue: शिवरायांचा पुतळा हटवणार नाही! गोवा सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

खरी कुजबुज: तिकिटासाठी 'रील'बाजी!

Jio Platforms IPO: जिओच्या आयपीओचा नवा विक्रम! अवघ्या 100 मिनिटांत पूर्ण सबस्क्रिप्शन; पहिल्याच दिवशी 3 पट मागणी

SCROLL FOR NEXT