CDS Bipin Rawat Death Dainik Gomantak
देश

CDS Bipin Rawat Death: सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) देखील उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) देखील उपस्थित होते. आतापर्यंत तीन जवानांना वाचवण्यात यश आले असल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र या हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायुसेनेने ट्विट करत सांगितले की, संरक्षण कर्मचारी (CDS) जनरल बिपिन रावत बुधवारी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन (Eucalyptus Hills) येथे स्टाफ कोर्समधील प्राध्यापक आणि विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी भेट देण्यासाठी जात होते. दरम्यान आज दुपारच्या सुमारास, चार क्रू सदस्य, CDS आणि इतर 9 प्रवासी घेऊन जाणाऱ्या IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ एक दुःखद अपघात झाला.

या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नीही होती. तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत होते. या सर्वांना उपचारासाठी वेलिंग्टन तळावर घेऊन जाण्यात आले होते. तर चौथ्या व्यक्तीचा शोध सुरु होता. (CDS Bipin Rawat Death)

दरम्यान, खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नी होते. तर इतर 3 सहकारी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात आले होते. या सर्वांना उपचारासाठी वेलिंग्टन तळावर नेण्यात आले होते. चौथ्या व्यक्तीचाही शोध सुरु असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत आपल्या पत्नीसोबत उटी येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र हा अपघात कुन्नूरच्या घनदाट जंगलात घडला. लष्कराने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नव्हते. हे हेलिकॉप्टर एमआय सीरीजचे होते. सीडीएस बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि काही कुटुंबीय या विमानामध्ये होते. स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT