Chandrayaan-3 Dainik Gomantak
देश

Chandrayaan 3 च्या प्रक्षेपणापुर्वी शास्त्रज्ञांची टीम तिरूपतीच्या दर्शनाला, पाहा Video

चांद्रयान 3 अंतरळयान 14 जुलै रोजी अवकाशात झेप घेणार आहे.

Puja Bonkile

Chandrayaan 3: चांद्रयान-3 श्रीहरिकोटा 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्याचे नियोजन करण्यात आले असून चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा चौथा देश बनणार आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे.

या महिमेअंतर्गत पहिल्यांदाच अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारताचा यापुर्वी एक प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इस्त्रो शास्त्रज्ञांची टीम चांद्रयान-3 चे लघु मॉडेल घेऊन आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिरात दर्शन करण्यासाठी पोहोचली आहे. याचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.  

लँडरमध्ये चार तर रोव्हरमध्ये दोन पेलोड

चांद्रयान-३ च्या लँडरमध्ये चार पेलोड आहेत, तर सहा चाकी रोव्हरमध्ये दोन पेलोड आहेत. याव्यतिरिक्त, प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री पेलोड देखील आहे जे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मोजमापांचा अभ्यास करेल.

लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युलवरील पेलोड शास्त्रज्ञांना चंद्र, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह याबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले आहेत. प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेच्या 100 किमीपर्यंत नेईल.

लँडर, रोव्हरची नावे जुनीच

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-3 च्या लँडर आणि रोव्हरला चांद्रयान-2 च्या लँडर आणि रोव्हरची नावे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याचा अर्थ लँडरचे नाव विक्रम असेल, हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. आणि रोव्हरचे नाव प्रज्ञान असेल.

चांद्रयान-३ म्हणजे काय?

चांद्रयान-3 अंतराळयान LVM3 (लाँच व्हेईकल मार्क-III) सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाईल. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 चांद्रयान-2 चा पुढील प्रकल्प आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चाचण्या घेईल. त्यात लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे.

हे चांद्रयान-2 सारखे दिसेल, ज्यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असेल. चांद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे.

मोहिमेच्या यशस्वितेसाठी, नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत, अल्गोरिदम सुधारण्यात आले आहेत आणि चांद्रयान-2 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलेल्या कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

चांद्रयान-2 च्या लँडर-रोव्हरच्या अपघातानंतर चार वर्षांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 (Chandrayaan 3) 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपित केलं जाईल. चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM3) रॉकेटद्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन स्पेस सेंटर (Satish Dhawan Space Centre) मधून प्रक्षेपित करण्यात येईल कारण हा भाग पृथ्वीच्या समोर येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT