Chandrayaan-3 Dainik Gomantak
देश

Chandrayaan-3: आज अपुन चांद पे है... चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Chandrayaan-3: चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर सोशल मीडियावर मीम्स पाऊस पडला आहे. यूजर्स आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करु लागले आहेत.

Manish Jadhav

Chandrayaan-3 Landing Memes: जगाच्या अंतराळ इतिहासात भारताने आपले नाव सोनेरी अक्षरांनी कोरले. आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्त्वाचा ठरला. चांद्रयान-3 (chandrayaan 3) आज (बुधवार) चंद्रावर यशस्वीपणे उतरले.

विक्रम लँडरने 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लँडिंग यशस्वी झाले, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

दुसरीकडे, चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर सोशल मीडियावर (Social Media) मीम्स पाऊस पडला आहे. यूजर्स आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करु लागले आहेत.

चांद्रयान-3 चा प्रवास

14 जुलै रोजी भारताने (India) LVM3 रॉकेटद्वारे 600 कोटी रुपयांचा खर्च करत 'चांद्रयान-3' प्रक्षेपित केले. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आणि आज सध्याकाळी 6:04 मिनिटांनी चांद्रयान 3 च्या विक्रम लॅंडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग केले.

दरम्यान, जुलैमध्ये प्रक्षेपण मोहीम सुरु झाल्यापासून ते चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नापर्यंत, भारताच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेने बराच मोठा पल्ला गाठला आहे. भारताने हा पराक्रम केला तेव्हा 80,59,688 हून अधिक लोक ऑनलाइन आले होते.

दरम्यान, Facebook वर, चांद्रयान-3 लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर 355.6K पेक्षा जास्त लोक ऑनलाइन होते.

सोशल मीडियावरील मीम्स

इस्रोच्या अधिकृत प्रसारण चॅनेलवर ज्यांनी चांद्रयान-3 लँडिंग लाईव्ह पाहिले त्यांच्या व्यतिरिक्त, केवळ भारतातच नव्हे तर देशभरातील असंख्य लोक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. भारतात, दूरदर्शन टीव्ही हे या महत्त्वाच्या प्रसंगाचे अधिकृत प्रसारक होते.

दूरदर्शनवरील प्रसारण किती लोकांनी पाहिले याची अधिकृत संख्या अद्याप जाहीर केली गेली नसली तरी, चांद्रयान-3 विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर चॅनेलच्या यूट्यूब लिंकवर 750,822 पेक्षा जास्त लोक ऑनलाइन आले होते.

दुसरीकडे, चांद्रयान-3 मिशन हे 2019 च्या चांद्रयान-2 मिशनची नवी आवृत्ती आहे, जेव्हा विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते. दरम्यान, 615 कोटी रुपयांचे अंदाजे बजेट असलेले चांद्रयान-3, त्याच्या पूर्ववर्तींच्या तुलनेत सर्वात किफायतशीर अंतराळ मोहिमांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-2 ची निर्मिती 978 कोटी रुपये खर्चून करण्यात आली, ज्यामध्ये ऑर्बिटर, लँडर, रोव्हर, नेव्हिगेशन आणि ग्राउंड सपोर्ट नेटवर्कसाठी 603 कोटी रुपये आणि GSLV रॉकेटसाठी रुपये 375 कोटींचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: डिस्को लाईट्स अन् 'विरुष्का'चा नादखुळा डान्स! आरसीबीच्या बॅक-टू-बॅक विजयाचं तगडं सेलिब्रेशन; रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

Goa Pink Taxi: पिंक रिक्षानंतर आता महिलांसाठी 'पिंक टॅक्‍सी'; सहकार खाते प्रयत्‍नशील, बँकांशी सकारात्मक चर्चा

Goa Road Accident: 'थार'की मृत्युचा सापळा? आठवड्यात तिघांचा बळी, पाच महिन्यांत 101 रस्ते अपघाती मृत्यू

अय्‍यांनी खडक फोडून आणले पाणी; देशभरात गाजली जिद्दीची कहाणी! 'मन की बात'मध्‍ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण मारा; प्रत्युत्तरात अमेरिकेचे 'सेल्फ-डिफेन्स' हल्ले तर इस्रायलकडून हिजबुल्लाहवर बॉम्बवर्षाव

SCROLL FOR NEXT