karti chidambaram Dainik Gomantak
देश

कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयच्या धाडी

दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणच्या मालमत्तेची घेतली झडती

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात देशातील संस्थांचा वापर करत आवाज दाबण्यात येत असल्याचे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या मालमतेवर सकाळी 6 वाजता 9 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. (CBI raids Karti Chidambaram's house )

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एका चालू प्रकरणाच्या संदर्भात काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. त्यांच्या कार्यालयाने एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. यामध्ये चेन्नई, दिल्ली आणि मुंबईसह नऊ ठिकाणी शोध घेतला जात आहे.

कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगा येथून काँग्रेसचे खासदार आहेत. त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात सीबीआयने ही कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास संस्थेने कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध 2010 - 2014 दरम्यान कथित विदेशी निधीप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे.

250 चिनी लोकांना व्हिसा दिल्याचा आरोप

कार्ती चिदंबरम यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेत 250 चिनी लोकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण पंजाबमधील एका वीज प्रकल्पाशी संबंधित आहे, ज्यामध्ये व्हिसा जारी करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे. चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, ओडिशा एकूण 9 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT