CBI raids In Bihar ANI
देश

CBI raids In Bihar: बिहारमध्ये फ्लोर टेस्टपूर्वी 24 ठिकाणी CBIचे छापे, 5 RJD नेते रडारवर

एकीकडे नितीश सरकार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करत आहे, तर दुसरीकडे बिहारपासून गुरुग्रामपर्यंत आरजेडी नेत्यांवर सीबीआयचे छापे सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

CBI raids In Bihar: नितीश कुमार आज बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. पण, त्याआधीच विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांनी राजीनामा दिला. यानंतर जेडीयूचे आमदार नरेंद्र नारायण यांच्याकडे ऑपरेशनची जबाबदारी देण्यात आली. आणि त्यानंतर बिहार विधानसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, एकीकडे नितीश सरकार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करत आहे, तर दुसरीकडे बिहारपासून गुरुग्रामपर्यंत आरजेडी नेत्यांवर सीबीआयचे छापे सुरू आहेत.

बिहारमधील आरजेडीचे एमएलसी सुनील सिंग यांच्यासह पाच नेत्यांवर सीबीआयने नोकरी घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली आहे. तर गुरुग्राममध्ये असलेल्या मॉलमध्ये सीबीआयने धाड टाकली आहे, ज्याचा संबध लालू यादव यांच्या कुटुंबीयांशी असल्याचे सांगितले जात आहे. लालू यादव यांच्या पक्षाच्या चार नेत्यांमध्ये सुनील सिंग, अश्फाक करीम, फय्याज अहमद, सुबोध राय, माजी आमदार आरजेडी अबू दोजाना यांचा समावेश आहे.

  • जाणून घेऊ कुठे काय परिस्थिती

सुनील सिंग

आरजेडी नेते, बिस्कॉमनचे अध्यक्ष सुनील सिंह यांच्या घरी मोठ्या संख्येने CBI टीम पोहोचली. सुनील सिंह यांनी ही कारवाई भाजपचा कट असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या इशाऱ्यावर हा छापा टाकला जात असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी सुनील सिंगची पत्नीही राग व्यक्त करताना दिसली. घरातून काही मिळाले नाही तर सीबीआयवर मानहानीचा खटला दाखल करेन, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. फयाज अहमद

राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार डॉ. फयाज अहमद यांच्या घरावर केंद्राच्या ईडीचे छापे टाकले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून सुरू झालेल्या या छाप्यात सुमारे 45 जणांची टीम आहे. डॉ. फयाज अहमद बिस्‍फी येथील राजदचे माजी आमदार आहेत आणि सध्या राजद कोट्यातून राज्यसभेचे खासदार आहेत.

अशफाक करीम

आरजेडीचे राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या घरावरही सीबीआय छापे टाकत आहे. याआधीही अश्फाक यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात त्यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुबोध राय

आरजेडी नेते आणि माजी आमदार सुबोध राय यांच्या घरावरही छापे टाकण्यात येत आहेत. सुबोध रॉय हे आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या खूप जवळ असल्याचे बोलले जाते.

अबू दोजाना

माजी आमदार आरजेडी अबू दोजाना यांच्या घरावरही छापे टाकण्यात येत आहेत. त्याचवेळी, पाटणासह एकूण 24 ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. आजपासून बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन आज आणि उद्या असे दोन दिवस चालणार आहे. यादरम्यान नितीश सरकारची शक्ती चाचणी होणार असून अध्यक्षाविरोधातील अविश्वास प्रस्तावावर दुसरे मतदान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT