Deputy Chief Minister Manish Sisodia Dainik Gomantak
देश

CBI Raid: CBI चा मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा, 20 ठिकाणांवर कारवाई

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. तसेच त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. तसेच त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी सरकारवरही निशाणा साधला त्या म्हणाले की, आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांचा अशा प्रकारे छळ केला जातो. (CBI Raid CBI raids Manish Sisodia house action at 20 places)

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून सीबीआय आल्याची माहिती दिली आहे, तर त्यांनी म्हटले की, हे स्वागतार्ह आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत, लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळेच आपला देश अजून नंबर-1 बनलेला नाहीये.

पुढे मनीष सिसोदिया म्हणाले की, हे लोक दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्याबाबत होत असलेल्या उत्कृष्ट कामावर नाराज आहेत. त्यामुळे दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली, जेणेकरून शिक्षण आरोग्याची चांगली कामे थांबवता येतील. सिसोदिया म्हणाले की, आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत आणि न्यायालयात सत्य बाहेर येईल.

देशातील चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही,
सिसोदिया म्हणाले की, आम्ही सीबीआयचे मी स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करू जेणे करून सत्य लवकरच बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक केसेस झाल्या पण काहीही बाहेर आलेले नाही. आणि त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही, देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही.

75 वर्षांत ज्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला त्याला रोखले गेले

सीबीआयच्या कारवाईवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल () म्हणाले की, संपूर्ण जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलवर सतत चर्चा करत आहे. आणि केंद्र सरकारला हे थांबवायचे आहे. त्यामुळे दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्र्यांवर छापे टाकून त्यांना अटक करण्यात येत आहे. 75 वर्षात ज्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला त्याला रोखले गेले आहे त्यामुळे भारत मागे राहिला.

यापूर्वीही अनेक तपास आणि छापे पडले,
दिल्लीतील चांगली कामे आम्ही थांबू देणार नाही, असे सीएम केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. ज्या दिवशी अमेरिकेतील सर्वात मोठ्या वृत्तपत्र NYT च्या पहिल्या पानावर दिल्ली शैक्षणिक मॉडेल आणि पेपरमध्ये मनीष सिसोदिया यांचा फोटो छापला गेला, त्याच दिवशी मनीष यांच्या घरी केंद्राने सीबीआयला पाठवली. सिसोदिया यांच्याप्रमाणेच केजरीवाल यांनीही सीबीआयचे स्वागत, असल्याचे सांगितले. आमचे पूर्ण सहकार्य असेल. यापूर्वीही अनेक तपास आणि छापे टाकण्यात आले मात्र काहीही निष्पन्न झालेले नाही. आणि आजही काही निष्पन्न होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT