CBI  Dainik Gomantak
देश

NEET परीक्षेत हेराफेरी, CBI ने मास्टरमाइंड अन् सॉल्व्हरसह आठ जणांना केली अटक

NEET UG 2022 Exam: CBI ने NEET UG 2022 च्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात हेराफेरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

दैनिक गोमन्तक

Mass Rigging Racket in NEET UG 2022 Exam: CBI ने NEET UG 2022 च्या परीक्षेतील हेराफेरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयने मुख्य सूत्रधार आणि सॉल्व्हरसह आठ आरोपींना अटक केली. हे आरोपी मूळ उमेदवारांऐवजी डमी उमेदवार बनून NEET UG परीक्षेत बसले होते, असे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने सांगितले.

NEET UG परीक्षेत हेराफेरी: आणखी तिघांनाही ताब्यात घेतले

सीबीआयकडून (CBI) मिळालेल्या माहितीनुसार, एजन्सीने मूळ उमेदवारांऐवजी परीक्षा देणाऱ्या मास्टरमाइंडसह आठ जणांना अटक केली आहे. याशिवाय अन्य तीन जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या तिघांची चौकशी सुरु आहे. त्याचवेळी सीबीआयने ताब्यात घेतलेल्या आरोपींची (Accused) नावे सुशील रंजन, ब्रिजमोहन सिंग, कृष्ण शंकर योगी, सनी रंजन, पप्पू, रघुनंदन, जीपू लाल, उमाशंकर गुप्ता, निधी, हेमेंद्र आणि भरत सिंग अशी आहेत.

सीबीआय आणि एनटीए गुप्त माहितीवर कारवाई करतात

दिल्ली आणि हरियाणातील (Haryana) अनेक केंद्रांवर कॉपी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची गुप्त माहिती सीबीआय आणि एनटीएला मिळाली होती. मूळ उमेदवारांऐवजी डमी उमेदवार म्हणून परीक्षेला बसण्याच्या उद्देशाने हे आरोपी आले होते. त्यांनी मूळ उमेदवारांच्या युजर आयडी आणि पासवर्डमध्येही हेराफेरी केली होती. त्याचबरोबर परीक्षेला बसण्यासाठी डमी उमेदवारांच्या फोटोचा आकारही बदलण्यात आला होता. या सॉल्व्हर आणि डमी उमेदवारांना उमेदवारांच्या वतीने लाच देण्यात आल्याचे एजन्सीने सांगितले.

18.72 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती

तपास यंत्रणेने केलेल्या या कारवाईची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही यास दुजोरा दिला आहे. पदवीपूर्व स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET UG परीक्षा रविवारी घेण्यात आली. ही परीक्षा देशभरातील आणि परदेशातील 550 हून अधिक शहरांमध्ये घेण्यात आली. परीक्षेसाठी 18.72 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी 18 लाखांहून अधिक म्हणजेच 99 टक्के उमेदवार परीक्षेला बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT