When choosing a branch of commerce Dainik Gomantak
देश

Career Opportunity: वाणिज्य शाखा निवडतांना

दहावीनंतर विद्यार्थ्यांना शास्त्र, वाणिज्य व कला यांपैकी एका शाखेची निवड करून आपल्या भविष्याची पायाभरणी करावी लागते.

दैनिक गोमन्तक

दहावीनंतर विद्यार्थ्यांना शास्त्र, वाणिज्य व कला यांपैकी एका शाखेची निवड करून आपल्या भविष्याची पायाभरणी करावी लागते. आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीत असलेला अंगभूत दोष म्हणजे, दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शास्त्र शाखेच्या (गणित आणि विज्ञान विषयांमुळे) आणि कला शाखेच्या (भाषा, इतिहास, भूगोल) विषयांची नीट ओळख असते, त्यामुळे अकरावीत शास्त्र किंवा कला शाखा घ्यावी की नाही याचा त्यांना अंदाज बांधता येतो.

मात्र, वाणिज्य शाखेच्या एकाही विषयाची दहावीपर्यंत तोंडओळखही नसल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेताना विद्यार्थी गोंधळलेले असतात, आणि मग बहुतेक वेळा शास्त्र शाखेला जाण्याची इच्छा नाही म्हणून विद्यार्थी वाणिज्य शाखेचा पर्याय निवडतात. खरे तर वाणिज्य शाखेचा एकही विषय माहितीचा नाही, ही एका अर्थाने इष्टोपत्ती ठरते. कारण, त्यामुळे विद्यार्थी वाणिज्य शाखेचे विषय अभ्यासताना पूर्वग्रहमुक्त असतात. सगळ्याच विद्यार्थ्यांना नव्याने सुरुवात करावी लागते आणि त्यामुळे दहावीपर्यंत विज्ञान, भाषा, गणित, इतिहास/भूगोल हे विषय आवडत वा झेपत नाहीत व त्यामुळे शाळेत फार चमकत नाहीत असे विद्यार्थी वाणिज्य विद्याशाखेत उत्तम प्रगती करू शकतात.

वाणिज्य विद्याशाखेतून उत्तम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर सीए, सीएस, सीएमए यासारख्या प्रोफेशनल कोर्सेस व्यतिरिक्त बीबीए /बीबीएम/ बीसीए, मास कम्युनिकेशन, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, अर्थशास्त्र या शाखांमध्ये पुढील शिक्षण घेता येते, तर पदवीनंतर एमबीए, लॉ, स्पर्धा परीक्षा, बॅंकिंग, इन्शुरन्स, टॅक्सेशन, मास कम्युनिकेशन अशा विविध क्षेत्रात करिअर करता येते.

अकरावी हे खरे तर वाणिज्य विद्याशाखेचे पायाभूत वर्ष असते. अकरावीचे गुण पुढे कधीच विचारात घेतले जात नसल्याने विद्यार्थी अकरावीचे वर्ष ‘रेस्ट इयर’ समजतात. या वर्षांचा वापर अत्यंत उत्तम रितीने करता येऊ शकतो. वाणिज्य शाखेतून उत्तम करिअर घडण्यासाठी रावीच्या वर्षी खालील गोष्टी करणे फायद्याचे ठरते.

शैक्षणिक कौशल्ये (वाचनाचा वेग, लिखाणाचा वेग, स्मरणशक्ती, अवांतर वाचन) विकसित करण्यावर भर द्यावा. ही सर्व कौशल्ये कशी शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित करता येतील हे पाहावे.

  • लिखित व मौखिक दोन्ही पद्धतीने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावे.

  • कॉम्प्युटरचा बेसिक कोर्स पहिल्या टर्ममध्ये, तर टॅली पॅकेज दुसऱ्या टर्ममध्ये शिकून घ्यावे.

  • अकाऊंटन्सी व इकॉनॉमिक्स या विषयांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, यातील ज्या विषयात जास्त रुची निर्माण होईल त्या विषयावर आधारित बारावीनंतर करिअरचा मार्ग निवडता येतो.

  • सी.ए. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या दुसऱ्या टर्मपासूनच सी.ए. फाऊंडेशन परीक्षेची तयारी सुरू करावी.

  • सी. ए. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावी, बारावीला गणित विषय घेणे फायद्याचे ठरते.

  • सी. एस. किंवा लॉ करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावी, बारावीला सेक्रेटरीयल प्रॅक्टिस विषय घेणे फायद्याचे ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT