Bipin Rawat Dainik Gomantak
देश

बिपिन रावत यांच्या मृत्यूने कॅनडाचे मंत्री देखील हळहळले

कॅनडाच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

कॅनडाच्या संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी बुधवारी निलगिरीमध्ये झालेल्या दुःखद हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या दुर्घटनेत भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाला.

ट्विटद्वारे राष्ट्रीय संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी शोक व्यक्त केला. त्या ट्विटमध्ये लिहितात, “मी भारतातील लोक, जनरल बिपिन रावत, श्रीमती मधुलिका रावत आणि या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या इतरांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते. या आव्हानात्मक काळात कॅनडा (Canada) भारताच्या (India) पाठीशी उभा आहे. आमचे विचार आणि प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत.”

कॅनडाचे सीडीएस जनरल वेन आयर यांनी देखील शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले की, “भारताचे संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि इतर 11 जणांचा हेलिकॉप्टर (Helicopter) अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजल्यावर मला अत्यंत दुःख झाले.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'ओपन जेल'साठी राजस्‍थान दौरा; कोर्टाचे गृह विभागाला निर्देश, कारागृह नियम दुरुस्तीसाठी समिती

NEET Exam: साडेचार हजार विद्यार्थी देणार 'नीट' परीक्षा; सरकारी यंत्रणा सज्ज, परीक्षा केंद्रांवर कदंबची विशेष बससेवा

Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आरबीआयने 'किसान क्रेडिट कार्ड'च्या नियमात केला मोठा बदल; कधीपासून होणार लागू?

Goa Police: पीएसआय पदे तात्काळ भरा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय द्या; गिरीश चोडणकरांची मागणी

Khazan Farming: एकात्मिक शेती पीक: मेरशीतील खाजन शेतीत अभिनव प्रयोग, आयसीएआरच्या ‘लँड-शेपिंग’ मॉडेलचा वापर

SCROLL FOR NEXT