Cabinet meeting chaired by the Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
देश

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळाची बैठक, या विषयांवर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली (Cabinet Meeting). या महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी अनेक प्रकल्पांचा प्रगती अहवाल घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य, ग्राहक आणि अन्न व पुरवठा मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली. यासह, त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठकीत सादरीकरणही देण्यात आले. पंतप्रधानांनी या प्रकल्पांबाबत अनेक सूचनाही दिल्या असल्याचे समजत आहे. (Cabinet meeting chaired by the Prime Minister Narendra Modi)

बैठकीच्या शेवटच्या फेरीत खुल्या सभागृहाचे अधिवेशन देखील झाले आहेत , ज्यात सरकारच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या मुद्यावर अनेक मंत्र्यांनी आपल्या सूचना पंतप्रधानांना सादर केल्या आहेत.

सत्तेवर आल्यापासून, पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठकांव्यतिरिक्त नियमित अंतराने मंत्री परिषदेच्या बैठका बोलावत राहतात. कॅबिनेट बैठकांमध्ये फक्त कॅबिनेट मंत्र्यांचा सहभाग असतो आणि जर इतर मंत्र्याच्या मंत्रालयाशी संबंधित कोणतीही बाब बैठकीच्या अजेंडामध्ये समाविष्ट असेल तर त्यांना बोलावले जाते. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिन्ही स्तरांचे मंत्री (कॅबिनेट मंत्री, राज्य-स्वतंत्र प्रभारी मंत्री आणि राज्यमंत्री) सहभागी असतात.

सामान्य भाषेत, याला चिंतन शिबीर असे नाव देण्यात आले आहे, ज्यात कनिष्ठ आणि नवीन मंत्री वरिष्ठ आणि जुन्या मंत्र्यांकडून कार्यशैली शिकतात तसेच या बैठकीत त्यांना पंतप्रधानांचे मार्गदर्शनही मिळते.

7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर ही चौथी वेळ होती जेव्हा पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. मागील बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक सादरीकरण केले. सरकारचे कामकाज सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची वृत्ती पाहता असे म्हणता येईल की येत्या काळात अशी चिंतन शिबिरे सुरूच राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT