Accident Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये भीषण अपघात, 17 जण जखमी

Accident: उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत.

Manish Jadhav

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये भीषण अपघात झाला. बिजनौर जिल्ह्यातील मंडावर पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिस अधीक्षक (एसपी) दिनेश सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ठाणे मंडावर भागातील मालन नदीच्या पुलावर भरधाव वेगात असलेली रोडवेज बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत बसमधील तस्लीम (65) या प्रवाशाचा मृत्यू झाला. तर 17 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सुलतानपूरमध्ये मजुराचा मृत्यू झाला

दुसरीकडे, सुलतानपूर जिल्ह्यातील कादीपूर कोतवाली भागात लखनौ-बलिया महामार्गावर ट्रॅक्टर आणि वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आझमगडमधील दोन मजूर ठार झाले. पोलिसांनी (Police) दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कादीपूर कोतवाली भागातील पदरथपूर गावाजवळ, लखनौ-बलिया महामार्गावरील सुलतानपूर बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली.

त्यांच्या म्हणण्यानुसार, धडक इतकी भीषण होती की, ट्रॅक्टरचा चकणाचूर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरचा चालक आणि त्यावर बसलेला अन्य एक जणाचा यामध्ये मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT