B. S. Yediyurappa Dainik Gomantak
देश

Yediyurappa: येडियुरप्पांचं पुत्र प्रेम, विधानसभा निवडणुकीत सोडणार शिकारीपुराची जागा

B. S. Yediyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Assembly Elections: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. बीएस येडियुरप्पा यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिकारीपुरा जागा सोडणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोडलेल्या जागेवर त्यांचा मुलगा बी. वाय विजयेंद्र निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांच्या या घोषणेकडे निवडणुकीच्या राजकारणातील डावाचा शेवट म्हणून पाहिले जात आहे.

येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) म्हणाले, 'मी निवडणूक लढवत नाही, विजयेंद्र शिकारीपुरातून निवडणूक लढवणार आहेत. शिकारीपुरा येथील जनतेला मी हात जोडून प्रार्थना करतो की, ते माझ्यापेक्षा मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत.'

दुसरीकडे, विजयेंद्र यांनी जुन्या म्हैसूर प्रदेशातून निवडणूक लढवावी या कार्यकर्त्यांच्या मागणीवर येडियुरप्पा म्हणाले, "तिथून निवडणूक (Election) लढवण्याचा त्यांच्यावर खूप दबाव आहे, परंतु मी जागा सोडत असून निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे विजयेंद्र शिकारीपुरामधून निवडणूक लढवणार आहेत."

2020 मध्ये विजयेंद्र यांना उपाध्यक्ष बनवण्यात आले

विजयेंद्र यांना जुलै 2020 मध्ये कर्नाटक (Karnataka) भाजपचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. मे 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हैसूरमधील वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे विजयेंद्र यांनी नाकारल्यानंतर लगेचच पक्षाने त्यांना भाजप युवा शाखेचे सरचिटणीस म्हणून नियुक्त केले होते.

पोटनिवडणुकीच्या विजयात महत्त्वाची भूमिका

2019 आणि 2020 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयेंद्र पक्षात चर्चेत राहिले. पोटनिवडणुकीत केआर पेट आणि सिरा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT