Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर तरुणाचा भन्नाट डान्स, यूजर्स म्हणाले, कतरिना कैफला...

Viral Video: सोशल मीडियावर तुम्ही डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकजण साडी नेसून आकर्षक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतात.

Manish Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर तुम्ही डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकजण साडी नेसून आकर्षक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतात. दरम्यान एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

साडी घालून एखाद्या मुलाने डान्स केला तर तुम्हाला कसे वाटेल. चक्क या मुलाने 'टीप-टीप बरसा पानी' गाण्यावर साडी घालून डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

'टिप टिप बरसा पानी' वर मुलाचा डान्स

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये रवीना टंडनच्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर साडी घालून एक मुलगा डान्स करत आहे. त्याचा हा डान्स अनेकांना आवडला असला तरी काही लोक त्याला ट्रोलही करत आहेत.

मात्र ते काहीही असो, सध्या त्याचा हा डान्स सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ बिनदिक्कतपणे शेअर करत आहेत. चला तर मग हा व्हिडिओ पाहूया.

यूजर्संनी त्याच्या या स्टाइलवर कमेंट केल्या

व्हिडिओमध्ये तो चक्क रविना टंडनसारखा डान्स करताना दिसत आहे. मुलींप्रमाणेच तोही लालित्य दाखवत आहे. मुलाने स्लीव्हलेस ब्लाउज आणि पिवळी साडी नेसलेली आहे आणि पावसात नाचत आहे. व्हिडिओतील मुलाचा डान्स पाहून तो कोणत्याही मुलीपेक्षा कमी आहे असे कोणीही म्हणू शकत नाही.

इन्स्टाग्रामवर (Instagram) धुमाकूळ घालणारा हा व्हिडिओ @amit_the_shinning_star नावाच्या युजरने शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने लिहिले - भाऊ, त्याने खरोखरच पाणी पेटवले आहे. दुसर्‍याने लिहिले - भावाने कतरिना कैफला तिच्या डान्सने मागे सोडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

SCROLL FOR NEXT