Bomb blast  Dainik Gomantak
देश

मुलांनी बॉल सारख्या वस्तूला हात लावताच झाला स्फोट

डॉक्टरांनी तीन जखमींना मालदा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी पाठवले आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमधील मालदा येथे बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पाच मुले जखमी झाली आहेत. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. सर्व जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी तीन जखमींना मालदा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालदा जिल्ह्यातील कालियाचक परिसरात काही मुले आंब्याच्या बागेत खेळत होती. खेळता खेळता मुलांची नजर बॉलसारख्या वस्तूवर पडली. मुलांनी त्या बॉल सारख्या वस्तूला हात लावताच स्फोट झाला.

बॉम्बस्फोटाच्या या घटनेत पाच मुले जखमी झाली आहेत. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलांना तात्काळ जवळच्या कालियाचक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन मुलांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी त्यांना मालदा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रेफर केले.

अन्य दोन जखमींवर कालियाचक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा बॉम्ब कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला याचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT