Manhar Udhas Dainik Gomantak
देश

Gujarat निवडणुकीपूर्वी बॉलीवूड गायक मनहर उधास यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

Gujarat Elections: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अद्याप 5 महिने बाकी असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat Assembly Elections: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अद्याप 5 महिने बाकी असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे बंधू मनहर उधास यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गांधीनगरमधील कमलम या पक्ष कार्यालयात त्यांनी औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. मनहर उधास (Manhar Udhas) यांचा जन्म राजकोटजवळील चरखडी गावात झाला. त्यांचे दोन्ही भाऊ पंकज उधास आणि निर्मल उधास हे देखील प्रसिद्ध गझलकार आणि संगीतकार आहेत. मनहर उधास यांनी हिंदीसह देशातील अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या सर्व गुजराती अल्बमची नावे 'ए' पासून सुरु होतात.

दुसरीकडे, मनहर उधास यांनी बहुतेक बॉलीवूड (Bollywood) संगीतकारांसोबत काम केले आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांसाठी प्ले बॅक सिंगर म्हणूनही काम केले. त्यांनी हिंदी, गुजराती, पंजाबी, बंगाली आणि इतर भाषांमधील 300 हून अधिक चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. आतापर्यंत त्यांचे 60 अल्बम रिलीज झाले आहेत. 'हिरो' या हिंदी चित्रपटात त्यांनी गायलेली गाणी खूप गाजली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT