CJI NV Ramana Dainik Gomantak
देश

इंदिरा गांधींना अपात्र ठरवण्याचा धाडसी निर्णय: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

1975 मध्ये, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा (Jagmohanlal Sinha) यांनी इंदिरा गांधींना अपात्र ठरवल्यावर देशाला हादरवून टाकणारा निर्णय दिला.

दैनिक गोमन्तक

भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा (CJI NV Ramana) यांनी प्रयागराज येथे एका आयोजित कार्यक्रमात 1975 मध्ये इंदिरा गांधींना अपात्र ठरवण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) निर्णयाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ''1975 मध्ये, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा (Jagmohanlal Sinha) यांनी इंदिरा गांधींना अपात्र ठरवल्यावर देशाला हादरवून टाकणारा निर्णय दिला. हा एक अतिशय धाडसी निर्णय होता, ज्याचा थेट परिणाम आणीबाणीची घोषणा होती असे म्हणता येईल. ज्या परिणामांची मी आता सविस्तर माहिती देऊ इच्छित नाही.

दरम्यान, सरन्यायाधीशांनी सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा 150 वर्षांहून अधिक इतिहास आहे. अलाहाबाद बार आणि खंडपीठाने देशातील काही महान कायदेशीर दिग्गजांची निर्मिती केली आहे. संविधान सभेचे पहिले अध्यक्ष डॉ सच्चिदानंद सिन्हा (Dr. Sachchidanand Sinha), पंडित मोतीलाल नेहरु (Pandit Motilal Nehru), सर तेज बहादूर सप्रू आणि पुरुषोत्तम दास टंडन हे सर्व या बारचे सदस्य होते. प्रसिद्ध चौरी चौरा प्रकरणात पंडित मदन मोहन मालवीय यांनी या उच्च न्यायालयासमोर अपील केले होते. हा काळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि आपल्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “मला आशा आहे की, तुम्ही या ऐतिहासिक बारचा विलक्षण वारसा, परंपरा आणि संस्कृती पुढे घेऊन झाल. नागरिकांचे हक्क, स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यांचे रक्षण करण्यासाठी अग्रणी भूमिका बजावण्याचे मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT