Indian Air Force C-130J Hercules aircraft Dainik Gomantak
देश

Kuwait Mangaf Building Fire: कुवेत दुर्घटनेतील 45 भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणले; भारतीय हवाई दलाचे विमान कोचीत दाखल!

Kuwait Mangaf Building Fire: कुवेतमधील इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह हवाई दलाच्या विमानाने भारतात आणण्यात आले आहेत.

Manish Jadhav

Kuwait Mangaf Building Fire: कुवेतमधील इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह हवाई दलाच्या विमानाने भारतात आणण्यात आले आहेत. कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 50 वर पोहोचली आहे. भारतीय हवाई दलाचे C-130J हरक्यूलिस विमान शुक्रवारी सकाळीच कुवेतहून निघाले होते. विमान थेट कोचीला पोहोचले. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे स्वतः कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. त्यानंतर हे विमान दिल्लीला रवाना होईल.

मृतांमध्ये सर्वाधिक केरळचे नागरिक आहेत

कुवेतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये (23) सर्वाधिक केरळचे नागरिक आहेत. यानंतर तामिळनाडू (7) दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत ओडिशातील दोन जणांचा मृत्यू झाला. याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, झारखंड, बंगाल, पंजाब आणि हरियाणामधील प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेत यांनी सांगितले होते की, आगीत जखमी झालेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी आणि मृतांचे मृतदेह मायदेशी आणण्यासाठी कुवेतला गेले होते. तर कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल याह्या यांनी सांगितले की, गुरुवारी रात्रीच एका भारतीयाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या स्थितीत मरण पावलेल्या भारतीयांची संख्या 46 वर पोहोचली आहे. कुवेतमधील मंगफ शहरात एका इमारतीला आग लागली. या इमारतीत सुमारे 160 लोक राहत होते, त्यापैकी बहुतेक प्रवासी कामगार होते.

कुवेतचे अमीर मेशाल अल अहमद आणि जाबेर अल सबाह यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. कुवेतचे उपपंतप्रधान शेख फहद युसूफ सौद अल सबाह यांनी घोषणा केली की, फायर सेफ्टीच्या उल्लंघनाबद्दल तक्रार करण्यासाठी हॉटलाइन सुरु केली जाईल. तक्रारीनंतर तात्काळ कारवाई केली जाईल. त्याचबरोबर सर्व इमारतींमध्ये फायर सेफ्टी व्यवस्था करण्यात आली आहे की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

Goa Crime: 'पूजा नाईक'च्या ताब्यातील आणखी चार कारगाड्या जप्त! म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या 'एजंट'च्या मुसक्या

Kalasa Banduri Project: 'कळसा-भांडुरा'बाबतीत कर्नाटकच्या अडचणी वाढल्या! आता ‘प्रवाह'च्या बैठकीकडे लक्ष

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT