Death Body  Dainik Gomantak
देश

भाजपच्या विजयाचा जल्लोष करताना कार्यकर्त्याचा मृत्यू

पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भारतीय जनता पक्षाचा (भाजप) कार्यकर्ता सतीश चौहान याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. बहरियाच्या नेवाडा गावात भाजपच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना दगडफेकीत जखमी झालेल्या सतीश चौहानचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.

यावर एसएसपी अजय कुमार यांनी बहरिया स्टेशन प्रभारी, एक एसआय आणि दोन पोलिस (Police) कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यासोबतच निरीक्षकासह 10 नावाजलेल्या आणि 25 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुबारकपूर गावात शनिवारी संध्याकाळी भाजप (BJP) कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत डीजेवर नाचत होते. यादरम्यान एका बाजूने दगडफेक करण्यात आली, यात 18 वर्षीय सतीश चौहान जखमी झाला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी (Doctor) त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी एसएसपी अजय कुमार म्हणाले, 'एसएचओ बहरिया रवी प्रकाश, एसआय संजय यादव, कॉन्स्टेबल विकास उपाध्याय आणि दीनदयाल दुबे यांना परिसरातील एका भाजप कार्यकर्त्याच्या संशयास्पद मृत्यूबद्दल वरिष्ठांना माहिती न दिल्याबद्दल शिक्षा करण्यात आली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT