Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत सहभागी होणार भाजपचा 'हा' दिग्गज नेता? पण...

BJP Leader: काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या ट्विटला उत्तर देताना शहजाद पूनावाला यांनी ही माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

Congress Bharat Jodo Yatra: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची चर्चा केली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या ट्विटला उत्तर देताना शहजाद पूनावाला यांनी ही माहिती दिली. पूनावाला म्हणाले की, 'ही यात्रा देशद्रोही टोळीपासून मुक्त होताच सर्वप्रथम मी त्यात सामील होईन.'

वास्तविक शहजाद पूनावाला आणि आचार्य प्रमोद ट्विटरवर एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसले. शहजाद पूनावाला यांनी बुधवारी ट्विटरवरुन आचार्य प्रमोद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्युत्तरात आचार्य प्रमोद यांनी लिहिले की, 'एक दिवस भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा.' प्रत्युत्तरात शहजाद पूनावाला यांनी लिहिले की, "स्वामीजी, म्हणूनच तुम्हाला काँग्रेसचा (Congress) नाही तर देशाचा विचार करुन महत्त्वाच्या काही सूचना केल्या आहेत. देशद्रोह्यांच्या टोळीतून देश मुक्त होताच मी या यात्रेत सर्वप्रथम सहभागी होईन.''

आचार्य प्रमोद यांनी शहजाद पूनावाला यांना विचारले की, आज टीव्ही डिबेटमध्ये येऊ नका. प्रत्युत्तरात पूनावाला म्हणाले की, 'म्हणूनच मी तुम्हाला एक भारतीय म्हणून ही सूचना केली आहे. देशद्रोह्यांच्या टोळीतून देश मुक्त होताच मी या यात्रेत सामील होईन.' राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशमध्ये आहे. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी गाझियाबाद येथून ही यात्रा पुन्हा सुरु झाली. राहुल गांधींची (Rahul Gandhi) ही यात्रा 20 जानेवारीला जम्मू-काश्मीरला पोहोचेल आणि 30 जानेवारीला संपेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

Kendra Drishti Yoga 2026: करिअरमध्ये येणार सोन्याचे दिवस! केंद्र दृष्टी योग 'या' राशींना करणार मालामाल; 2 ऑक्टोबरपासून मिळणार अफाट यश

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT