BJP MP & former cricketer Gautam Gambhir get death-threats from ISIS  Dainik Gomantak
देश

भाजप खासदार गौतम गंभीर यांना ISIS कडून जीवे मारण्याची धमकी

गंभीरने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असून त्याला 'इसिस काश्मीर' (ISIS)कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे सांगितले आहे

दैनिक गोमन्तक

पूर्व दिल्ली मतदारसंघातील भाजप खासदार (BJP) आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे वास्तविक, गंभीरने दिल्ली पोलिसांशी (Delhi Police) संपर्क साधला असून त्याला 'इसिस काश्मीर' (ISIS)कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे सांगितले आहे असून डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले की, आम्हाला याची माहिती मिळताच आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले असून याशिवाय सुरक्षेसाठी गंभीरच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. (BJP MP & former cricketer Gautam Gambhir get death-threats from ISIS)

दरम्यान अलीकडेच गौतम गंभीरने नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मोठा भाऊ असल्याच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला होता पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी अधिकारी इम्रान खानच्या वतीने त्यांचे स्वागत करताना दिसत आहे आणि ते असे म्हणताना ऐकू येत आहे की, खान हे त्यांच्या "मोठ्या भावासारखे" आहेत आणि त्यांचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यानंतर गौतम गंभीर शनिवारी म्हणाला, 'नवज्योत सिंग सिद्धूने आपल्या मुलांना सीमेवर पाठवावे.

जर त्यांची मुलं सैन्यात असती, तर ते कर्तारपूर साहिबमध्ये इम्रान खानला आपला मोठा भाऊ म्हणतील का?'' गंभीर म्हणाले की, गेल्या एका महिन्यात काश्मीरमध्ये झालेल्या 40 नागरिक आणि सैनिकांच्या हत्येवर सिद्धू भाष्य करत नाहीत आणि जे लोक त्यांच्या विरोधात जातात. आपल्याला भारताचे रक्षण करायचे आहे.गौतम गंभीर म्हणाला, 'सिद्धूचे यापेक्षा लाजिरवाणे विधान असू शकत नाही. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारतात , ते करतारपूर साहिबला जातात आणि इम्रान खानला त्याचा मोठा भाऊ म्हणतो. कॅप्टन अमरिंदर सिंग हे भारताचे रक्षण करायचे आणि देशाबद्दल बोलतात, तेव्हा सिद्धू यांनी सहकार्य केले नाही. यापेक्षा लाजिरवाणे काय असू शकते?'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT