Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
देश

गोव्यातील भाजप नेत्यांनी उत्पलला डावलून मोदींचा पराभव केला

आरोपी असलेल्या नेत्यांना तिकिट देवून पणजीतल्या भाजपच्या नेत्यांनी मोदींचा पराभव केला आहे.

Priyanka Deshmukh

गोव्यात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना उमेदवारी नाकारली जाणे तसेच उत्पल पर्रीकरानांही त्यांच्या पसंतीच्या पणजी मतदारसंघातून उमेदवारी देण्यास नकार देणे, या दोन घटना गोव्याच्या राजकारणात लक्षवेधी ठरल्या आहेत. (Goa Assembly Election News Updates)

उत्पल पर्रिकरांच्या (Utpal Parrikar) अपक्ष लढण्याच्या निर्णयानंतरही शिवसेनेचे (ShivSena) नेते संजय राउत (Sanjay Raut) यांनी पर्रिकर पुत्राला पाठिंबा दर्शविला आहे. या आधीही राउत यांनी गोव्यात उत्पल यांना शिवसेनेचे तिकिट देण्याचा अप्रत्यक्ष प्रस्ताव दिला होता. आणि आज पणजी मतदारसंघाचा उल्लेख करत भाजपच्या एका निर्णयामुळे देशाच्या पंतप्रधानांचा पराभव झाल्याची टीका संजय राउत यांनी केली.

"उत्पल पर्रिकर प्रवाहाविरूद्ध, पणजी मतदारसंघातून लढत आहेत त्यामुळे त्यांना सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे. त्यांची लढाई अन्यायाविरूद्ध आहे. देशाच्या राजकारणाचे प्रवाह स्वच्छ करण्याच्या गोष्टी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी केल्या होत्या. देशाची राजकीय परिस्थिती निटनेटकी राहण्याची बाब त्यांच्याच डोक्यातून आली होती. पण आता त्याच्याच पक्षाने गोव्यात अनैतिक राजकारण केले आहे. आरोपी असलेल्या नेत्यांना तिकिट देवून पणजीतल्या भाजपच्या (BJP) नेत्यांनी मोदींचा पराभव केला आहे. एवढेच नव्हे तर गोव्यात भाजपने ड्रग माफिया, बलात्कारी, भ्रष्टाचारी आणि क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या नेत्याला पणजी (Panaji) मतदार संघाची उमेदवारी दिली म्हणून उत्पल यांना अपक्ष लढावे लागत आहे, आणि म्हणूनच उत्पल पर्रिकरांच्या प्रामाणिक लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत, कारण उत्पल पर्रिकरांचा मुद्दा पणजीपुरता मर्यादित नाही तर तो देशाच्या राजकारणाचा भाग बनला आहे," असे संजय राउत आज बोलत होते.

गोव्यासारख्या लहान राज्यात पक्षांतरांचे वारे जोरदार वाहत आहे. भाजपचा ( BJP) विचार करता माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना उमेदवारी नाकारली जाणे, उत्पल पर्रिकरांना डावलून एका आरोपी आणि क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या नेत्याला तिकिट दिल्याने अवघ्या राज्याचे लक्ष आता पणजी मतदार संघाकडे लागले आहे. येणार काळ कसा असणार पणजीमध्ये कोण बाजी मारणार हे तर गोवेकर ठरवतीलच मात्र देशातील बड्या राजकीय नेत्यांचेही गोवा निवडणुकीकडे (Goa Election 2022) लक्ष असणार आहे हे नक्कीच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT