Bengal Twitter/ @ANI
देश

West Bengal मध्ये भाजपच्या निदर्शनाला हिंसक वळण, दगडफेकीला पोलिसांचे चोख प्रत्युत्तर

Bharatiya Janata Party: पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) 'नबान्ना अभियाना'ने मंगळवारी हिंसक वळण घेतले.

दैनिक गोमन्तक

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) 'नबान्ना अभियाना'ने मंगळवारी हिंसक वळण घेतले. मध्य कोलकाता येथील बडा बाजार भागात आज दुपारी पोलिस ठाण्याजवळ पोलिसांची गाडी पेटवून देण्यात आली. घटनास्थळावरुन मिळालेल्या व्हिडिओमध्ये लोक लाठ्या-काठ्या घेऊन धावताना दिसत आहेत. दगडफेक करतानाही लोक दिसत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना एका मोर्चादरम्यान संत्रागाछी येथे जाण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या (Police) गाडीला आग लावण्याच्या घटनेनंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. बडा बाजार हे शहरातील सर्वात वर्दळीच्या घाऊक बाजारांपैकी एक आहे. घटनास्थळावरुन समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शहरातील जवळपास सर्व दुकाने बंद असल्याचे दिसून येत आहे. आदल्या दिवशी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) विरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांशी चकमक झाली होती.

तसेच, सत्ताधारी ममता सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. राज्याच्या पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील पानागढ रेल्वे स्थानकावरुन मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या भाजपच्या (BJP) चार कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

शिवाय, अधिकारी यांच्याशिवाय भाजप नेते आणि खासदार लॉकेट चॅटर्जी आणि पक्षाचे नेते राहुल सिन्हा यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 'सेकंड हुगळी ब्रिज' जवळील पोलिस ट्रेनिंग स्कूलसमोर त्यांना रोखण्यात आले. राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात 'नबन्ना अभियाना' मध्ये भाग घेण्यासाठी राज्यभरातील भाजप समर्थक मंगळवारी सकाळी कोलकाता आणि शेजारच्या हावडा येथे पोहोचू लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT