Triple Talaq Dainik Gomantak
देश

तिहेरी तलाक ! गोव्यात कुक म्हणून काम करणाऱ्या तरूणाने फोनवरून पत्नीला दिला घटस्फोट, घरातूनही हाकलले

पीडित महिलेचा विवाह 2010 साली सुंदरी गावात राहणारा मो शाहनवाज आलम उर्फ ​​सोनू याच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजांनुसार झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Bihar Triple Talaq News: मोबाईल फोनवरून पत्नीला तिहेरी तलाक दिला. एवढेच नव्हे तर घटस्फोट घेतल्यानंतर सासरच्यांनी तिला मारहाण करून घरातून हाकलूनही दिले. बिहार राज्यातील शेखपुरा येथे ही घटना घडली आहे.

या महिलेचा पती गोव्यातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून मंगळवारी स्थानिक महिला पोलीस ठाणे शेखपुरा येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचा विवाह 2010 साली सुंदरी गावात राहणारा मो शाहनवाज आलम उर्फ ​​सोनू याच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजांनुसार झाला होता. अशी माहिती पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक चंदना कुमारी यांनी वृत्तपत्राला दिली आहे.

लग्नानंतर विवाहित महिला तीन वेळा गरोदर राहिली. मात्र प्रत्येक वेळी विवाहित महिलेचा गर्भपात झाला. पतीने विवाहितेला मार्च महिन्यात मोबाईलवर फोन करून मूल होत नसल्याप्रकरणी दोष देत तिहेरी तलाक दिला होता.

पतीने घटस्फोट दिल्यानंतर सासरच्यांनी विवाहितेला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. घटनेपासून विवाहित महिला तिच्या माहेरी राहत आहे. विवाहितेने सांगितले की, तिचा नवरा गोव्यातील एका मोठ्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो.

या घटनेसंदर्भात नोंदवलेल्या एफआयआर मध्ये पती, सासू, मेहुणीसह 9 जणांना आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशी माहिती महिला पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी वृत्तपत्राला दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT