Sushil Modi Dainik Gomantak
देश

Bihar Politics:'नितीश-तेजस्वी सरकार 2025 पूर्वीच पडेल...', सुशील मोदींची भविष्यवाणी

Sushil Modi: नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

दैनिक गोमन्तक

Bihar Politics: नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. ते आठव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. मात्र, फरक एवढाच आहे की, गेल्या वेळी ते एनडीएसोबत युतीत होते, यावेळी त्यांनी महाआघाडीसोबत सरकार स्थापन केले आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारबद्दल बोलायचे झाल्यास, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप खासदार सुशील मोदी यांनी भाकीत केले की, हे सरकार 2025 मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच पडेल.

दरम्यान, नितीश कुमार आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना पाच दशकांहून अधिक काळ ओळखणारे सुशील मोदी (Sushil Modi) म्हणाले की, 'जेडी(यू) सुप्रिमोने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएला मतदान करणाऱ्या बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे.' एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, माजी उपमुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, ''नितीश कुमार (Nitish Kumar) राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील.''

''नव्याने स्थापन झालेले बिहार (Bihar) सरकार (आरजेडी नेते) तेजस्वी यांच्यासोबत प्रत्यक्ष मुख्यमंत्री म्हणून कसे कार्य करते हे आम्हाला पाहायचे आहे, ते पुढील निवडणुकीपूर्वी पडेल," असेही मोदींनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT