Crime News Dainik Gomantak
देश

Bihar Crime: धक्कादायक! 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, पंचायतीच्या निर्णयानंतर वडिलांची पोलिसांकडे धाव

Crime News: पीडीत मुलीच्या वडिलांनी पंचांचा निर्णय धूडकावून लावत न्यायासाठी पोलीस ठाणे गाठले.

Manish Jadhav

Bihar Crime: बिहारमधील भागलपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, त्यानंतर पंचायतीने मुलीच्या इज्जतीवर घाला घातला. या अल्पवयीन मुलीवर गावातील एका तरुणाने महिनाभर बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मुलगी गरोदर राहिली, तेव्हा ही बाब समोर आली. हे प्रकरण पंचायतीपुढे पोहोचल्यानंतर सरपंचाने मुलीच्या वडिलांना एक लाख रुपये घेऊन मुलीचा गर्भपात करुन प्रकरण मिटवण्यास सांगितले.

मात्र, पीडीत मुलीच्या वडिलांनी पंचांचा निर्णय धूडकावून लावत न्यायासाठी पोलीस ठाणे गाठले.

दरम्यान, आरोपी (Accused) मुलीच्या वडिलांकडे मजुरीचे काम करायचा. पीडितेच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. यादरम्यान त्याने तिला आपल्या जाळ्यात अडकवले आणि तिच्यावर बलात्कार केला.

'पोटात दुखू लागल्यानं मुलीला कळलं'

खरे तर, गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या पोटात सातत्याने दुखत होते. यानंतर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, तुमची मुलगी 6 महिन्यांची गरोदर आहे. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्यानंतर पीडितेने सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पंचायतीकडे न्यायाची मागणी केली. पंचायतीने पीडितेच्या वडिलांना एक लाख रुपये घेऊन आपल्या मुलीचा गर्भपात करण्यास सांगितले.

मात्र, पीडितेच्या वडिलांनी न्याय न मिळाल्याने पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे.

आरोपी तंबू ठोकण्याचे काम करतो

याप्रकरणी पीडितीने पोलिसांना सांगितले की, तो तंबू बांधण्याचे काम करतो. तो मजुरी आणि अभ्यासही करतो. तो वडिलांसोबत काम करायचा. त्यामुळेच त्याचे घरी येणे-जाणे होते. त्याने तिच्यावर प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करायचे आहे असे सांगून त्याने अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले.

मात्र, ती गरोदर राहिल्यावर त्याने लग्नास नकार दिला. पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करुन तुरुंगात डांबले आहे. लग्नाच्या बहाण्याने आरोपीने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचे पीडितेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT