Intranasal Vaccine

 

Dainik Gomantak 

देश

भारत बायोटेकला बूस्टर डोस च्या तिसऱ्या फेज साठी मंजूरी !

भारत बायोटेकला बूस्टर डोज च्या तिसऱ्या फेजसाठी DCGI कडून मंजूरी मिळाली असून 5000 लोकांवर क्लिनिकल ट्रायल घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने धुमाकूळ घातल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याची चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे. तर मागील काही दिवसांपासून दिल्ली, महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे निर्बंध लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याच पाश्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) देशात 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination) सुरु केले आहे.

दरम्यान, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (SEC)ने भारत बायोटेक (Bharat Biotech)ला कोरोनावायरस इंट्रानैसल लसीकरण आणि बूस्टर डोज च्या तिसऱ्या फेज ला मंजूरी दिली असून, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने भारत बायोटेक ला मंजूरी साठी प्रोटोकॉल जमा करण्यास सांगितले आहे. वॅक्सिन बनविणाऱ्या कंपनी ने इंट्रानेसल वॅक्सीन आणि बूस्टर डोसच्या क्लिनिकल ट्रायलसाठी अर्ज केला होता. जगातिल लोकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे, जेणे करुन नव्या व्हेरिएंटपासून नागरिकांची सुरक्षा मिळू शकेल.

तसेच, ज्या लोकांनी कोविशील्ड (Covishield) किंवा कोवॅक्सीन (Covaxin) लस घेतली आहे, त्याच लोकांना बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव भारत बायोटेकने दिला आहे. 5000 लोकांवर क्लिनिकल ट्रायल घेण्याचे उद्दिष्ट भारत बायोटेकचे असून 50 टक्के कोविशील्ड आणि 50 टक्के कोवॅक्सीन घेतलेले लोक यामध्ये सामील असतील. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, दूसऱ्या आणि तीसऱ्या लसीच्या दरम्यान सहा महिन्यांचे अंतर असू शकते. त्याचबरोबर चाचण्या वेळेवर झाल्यास भारताला मार्चमध्ये इंट्रानेसल बूस्टर लस मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर अशा परिस्थितीत कोरोनाविरुद्धची लढाई अधिक मजबूत होईल.

नेमकी काय आहे इंट्रानेसल वॅक्सीन?

नोवेल एडेनोवायरस वेक्टर वर आधारित BBV154 ही कोविड-19 विरुद्धची इंट्रानेसल लस आहे. जी IgG,म्यूकोसल IgA आणि T पेशींच्या प्रतिसादांना निष्क्रीय करण्यासाठी चालना देते. सर्वात महत्वपूर्ण म्हणजे कोरोनाचं संक्रमण आणि फैलाव रोखण्यासाठी नोवल हे महत्वाचे काम करते. ही लस सुई मुक्त असल्याने संक्रमण आणि जखम होण्याचा धोका कमी होतो. तसेच महत्वाचे म्हणजे नेसल वॅक्सीन घेण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही. मागील वर्षी आयोजित केलेल्या नेसल लसीच्या फेज 1 आणि फेज 2 चाचण्यांमध्ये एकूण 400 आणि 650 व्यक्तींनी भाग घेतला होता. इंट्रानेसल लसीबद्दल तपशीलवार माहिती देताना भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला (Dr.Krishna Ella) म्हणाले, "तुम्ही नेसल वॅक्सिनचा एकच डोस घेतल्यास संसर्ग टाळू शकता आणि संक्रमणाची साखळी तोडू शकतो."

कोरोनाचा वाढता आलेख रोखण्यासाठी अशी होऊ शकते मदत

नेसल वॅक्सिन पोलिओ सारखे नाकाद्वारे देण्यात येते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) सारख्या जागतिक संस्थेने सुध्दा या वॅक्सिनला दुसऱ्या पिढीची लस मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT