Viral Post Dainik Gomantak
देश

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Bengaluru Restaurant Body Shamed A Man: बंगळुरुतील कोरमंगला भागातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाला मिळालेल्या बिलाच्या पावतीवर अत्यंत आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळाला.

Manish Jadhav

Bengaluru Restaurant Body Shamed A Man: बंगळुरुतील कोरमंगला भागातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाला मिळालेल्या बिलाच्या पावतीवर अत्यंत आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळाला. रेस्टॉरंटने बिल पावतीवर ग्राहकाचे नाव किंवा टेबल क्रमांक लिहिण्याऐवजी त्याच्या शारीरिक रुप-रंगाचा आणि आकाराचा उल्लेख करत टिप्पणी केली. ग्राहकाच्या पावतीवर त्याच्या नावाऐवजी “लिटल फॅट ब्लॅक शर्ट”, असे लिहिले असल्याचे समोर आले. बिलाची पावती पाहताच ग्राहकाने या प्रकारावर आक्षेप नोंदवला आणि या घटनेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

संबंधित ग्राहकाने 'Reddit' वर बिलाचा फोटो शेअर करत रेस्टॉरंटच्या या व्यवस्थापनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी त्याचे नाव, टेबल नंबर किंवा ऑर्डर डिटेल्स अशा सामान्य गोष्टी लिहिल्या जातात, असे असताना बॉडी शेमिंग करणे अत्यंत अयोग्य असल्याचे त्याने म्हटले. तसेच, हा प्रकार पुरुषाबाबत घडला असला तरी याला केवळ एक हलका-फुलका विनोद मानून दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे सांगत त्याने 'बॉडी-शेमिंग'चा गंभीर आरोप केला.

त्याचवेळी, या घटनेचा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंट व्यवस्थापनावर चौफेर टीका होऊ लागली. वाद वाढलेला पाहून रेस्टॉरंट व्यवस्थापनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त केली. रेस्टॉरंटने आपल्या कर्मचाऱ्याच्या या वर्तनाबद्दल ग्राहकाची माफी मागितली आणि कोणत्याही परिस्थितीत 'बॉडी-शेमिंग'चे समर्थन केले जाऊ शकत नाही, अशी भूमिका घेतली.

तसेच अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत या विषयाची दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेने व्यवसायांमध्ये ग्राहकांची (Customers) ओळख पटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनधिकृत पद्धतींवर आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर पुन्हा एकदा मोठी चर्चा घडवून आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Development Fund: 'गोव्याच्या विकासासाठी भरपूर निधी देऊ'; फोंड्यात शिवराजसिंह चौहान यांचे आश्वासन, 80 कोटींच्या धनादेशांचे वितरण

Contract Teachers Protest: 22 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य करा; अन्यथा 23 पासून बेमुदत उपोषण, कंत्राटी शिक्षकांचा सरकारला इशारा

PM Kisan Portal Update: 24व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान पोर्टलमध्ये मोठा बदल! शेतकऱ्यांसाठी 4 महत्त्वाच्या सुविधा सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

Goa CZMP: 30 लाखांमुळे लटकला 'कुशावती'चा आराखडा; नव्या जिल्ह्याच्या समावेशासाठी अतिरिक्त निधीची मागणी

SCROLL FOR NEXT