shacks Dainik Gomantak
देश

गोव्यासारख्या शॅक्स उभारण्याच्या योजनेला ओडिशात विरोध

पुरी आणि कोणार्कच्या (Konark) समुद्रकिनाऱ्यावर गोव्यासारख्या (Goa) शॅक्स (shacks) बांधण्याच्या ओडिशा सरकारच्या (Odisha Government) योजनेला विरोध

दैनिक गोमन्तक

पुरीचे (Puri) शंकराचार्य स्वामी निछलानंद सरस्वती पुरी आणि कोणार्कच्या (Konark) समुद्रकिनाऱ्यावर गोव्यासारख्या (Goa) शॅक्स (shacks) बांधण्याच्या ओडिशा सरकारच्या (Odisha Government)योजनेला विरोध करत आहे. या योजनेला विरोध करतांना त्यांच्याबाजूने सुमारे 50 विविध संघटना उभ्या आहेत. या शॅक्सच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटकांना दारू पुरवण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. (Beach cottage scheme is being opposed in Odisha)

ओडिशा एक्साइज पॉलिसी, 2021 अंतर्गत प्रस्तावित समुद्रकिनाऱ्यावर बांधल्या जाणाऱ्या शॅक्समधून पर्यटकांना दारू पुरवली जाणार आहे. पुरीच्या स्थानिक रहिवाशांसह मोठ्या संख्येने लोकांनी सरकारच्या योजनेवर चिंता व्यक्त केली आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर शॅक्स बांधण्याच्या निविदा त्वरित थांबविण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारच्या अशा हालचालीबद्दल निराशा व्यक्त करत शंकराचार्य गुरुवारी म्हणाले की, श्री जगन्नाथ धाम पुरी हे आध्यात्मिक आणि धार्मिक चिंतनाचे ठिकाण आहे. कोणत्याही परिस्थितीत, पुरीच्या किनाऱ्यावर मद्य आणि इतर मादक पदार्थांना परवानगी देणार नाही. पुरी समुद्रकिनाऱ्यावर तीन किलोमीटरपर्यंत भजन, कीर्तन आणि आरतीचे ठिकाणं असावे अशी माझी मागणी आहे. पुरी समुद्रकिनारी ओडीशा सरकारचा हा प्रस्ताव अमान्य आहे.

महिला कार्यकर्त्यांनीही राज्य सरकारच्या योजनेवर चिंता व्यक्त केली

दरम्यान, सामाजिक संस्थांच्या शिष्टमंडळाने पुरीचे जिल्हा दंडाधिकारी समर्थ वर्मा यांची भेट घेतली आणि पुरी जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या नावाखाली समुद्रकिनाऱ्यावरील 'शॅक्स' योजना मागे घेण्याची मागणी केली. अनेक महिला कार्यकर्त्यांनीही राज्याच्या योजनेवर चिंता व्यक्त केली. समुद्रकिनाऱ्यावर शॅक्स उभारल्याने ओडिशामध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांना दुजोरा मिळेल असा दावाही करण्यात आला आहे.

पुरीचे जिल्हा दंडाधिकारी समर्थ वर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही विविध पैलूंचा विचार करू. तो अजूनही प्रस्तावाच्या टप्प्यात आहे. यापूर्वी, समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य सरकारने ओडिशा पर्यटन विकास महामंडळाद्वारे (OTDC) सुरुवातीला पुरी ते कोणार्क पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर शॅक्स उभारण्यासाठी निविदा मागवल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT