Baba Ramdev Dainik Gomantak
देश

अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात बोलून रामदेव बाबा वादाच्या भोवऱ्यात, SC ने मागितले उत्तर

Baba Ramdev: अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवरील कथित वक्तव्यामुळे योगगुरु रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढत आहेत.

दैनिक गोमन्तक

Baba Ramdev: अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवरील कथित वक्तव्यामुळे योगगुरु रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढत आहेत. आता या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने रामदेव यांना जाब विचारला आहे. कोर्टाने बाबा रामदेवांना उत्तर देण्यास सांगितले आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानेही अॅलोपॅथीच्या विरोधात बोलून दिशाभूल करु नका, असे म्हटले होते.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पतंजली आयुर्वेद आणि केंद्र सरकारला (Central Government) नोटीसही बजावली आहे. अ‍ॅलोपॅथीची बदनामी करणाऱ्या जाहिराती दाखवल्याबद्दल कोर्टाने स्पष्टीकरण मागितले आहे.

दुसरीकडे, भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, 'रामदेव बाब आपली व्यवस्था लोकप्रिय करु शकतात, परंतु इतरांवर टीका का करायची? आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांनी योगासन लोकप्रिय केली आहेत. परंतु इतर व्यवस्थेबाबत चुकीचे बोलणे त्यांनी टाळावे.'

तसेच, रामदेव बाबा जे काही सांगतील त्यामुळे सर्व काही ठीक होईल याची काय हमी आहे, असे सीजेआयच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने विचारले. याचिकेत आयएमएने मॉडर्न मेडिसिनविरोधात सुरु असलेल्या मोहिमेवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली होती.

हायकोर्टानेही फटकारले

रामदेव बाबा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्याबद्दल म्हटले होते की, 'लस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.' यासोबतच त्यांनी याला वैद्यकीय शास्त्राचे अपयशही म्हटले. त्यावर न्यायमूर्ती अनूप जयराम म्हणाले होते की, 'आधी मला काळजी वाटत होती की, आयुर्वेदाचे चांगले नाव खराब होत आहे. मला याची काळजी वाटत होती. आयुर्वेद ही प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेदाचे नाव बदनाम करणारे काहीही करु नका.'

ते पुढे म्हणाले होते की, 'इथे दुसऱ्या लोकांची नावे घेतली जात आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय परिणाम होऊ शकतात... अशा नेत्यांची नावे घेतली जात आहेत, ज्यामुळे दोन देशातील संबधांत कटुता येऊ शकते.' अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे अनेक डॉक्टरांच्या संघटनांनी रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT