Targeted by tanks Dainik Gomantak
देश

Israel vs Hamas War : गाझात घुसून सैनिकांचे हल्ले ; हमासची ठिकाणे रणगाड्यांद्वारे लक्ष्य

आतापर्यंतच्या संघर्षात गाझा पट्टीतील साडे सहा हजारांच्या जवळपास नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Israel vs Hamas War:  राफा हमास या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण विनाश करण्याच्या उद्देशाने गाझा पट्टीच्या सीमेवर जमा झालेल्या इस्रायली सैनिकांच्या काही तुकड्यांनी आणि रणगाड्यांनी बुधवारी रात्री उत्तर गाझामध्ये घुसत अनेक ठिकाणी हल्ले केले.

काही तास चाललेल्या या कारवाईत हमासची अनेक ठिकाणे लक्ष्य करण्यात आली.

हमासने सात ऑक्टोबरला केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्राईलने दोन आठवड्यांहून अधिक काळ केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीत प्रचंड जीवित आणि वित्त हानी झाली आहे.

अन्न-पाणी, इंधन, वैद्यकीय उपचार यांच्यावाचून सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचे हाल होत आहेत. हमासचे अस्तित्व नष्ट केल्याशिवाय कारवाई न थांबविण्याचा निश्‍चय केलेल्या इस्राईलने अनेक नागरी ठिकाणांवरही हवाई मारा केला आहे.

आतापर्यंतच्या संघर्षात गाझा पट्टीतील साडे सहा हजारांच्या जवळपास नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या भागात सैन्य घुसवून हमासला नेस्तनाबूत करण्याचा इस्राईलचा निश्‍चय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT