Atique Ahmed Dainik Gomantak
देश

Atiq Ahmed Murder Case: साबरमतीच्या तुरुंगातून बिल्डरला दिली होती धमकी; दोन प्रकारच्या पावत्या..

Atiq Ahmed Murder Case: बिल्डरने अतिकचा मुलगा असदला 80 लाख रुपए दिले होते.

दैनिक गोमन्तक

Atiq Ahmed Murder Case: उत्तरप्रदेशमध्ये गॅंगस्टर अतिक अहमद आणि अशरफची हत्या झाल्यानंतर फक्त उत्तरप्रदेशच नाही तर संपूर्ण देश हादरुन गेला आहे. त्यांच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या हत्येबाबतचे दर दोन तासांनी रिपोर्ट देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. याबरोबरच, सामान्य नागरिकांना त्रास होऊ न देता तपासाची ही प्रक्रिया करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

अतिक अहमदच्या हत्येनंतर त्याच्याबाबतच्या अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. आता साबरमतीमधील तुरुंगातूनदेखील आपली गॅंग चालवत असल्याची माहीती समोर आली आहे. अतिकने मोबाईलचा वापर करुन एका बिल्डरला धमकी दिली होती. 5 कोटी देण्यासाठी बिल्डरला धमकी देण्यात आली होती. त्यानंतर या बिल्डरने अतिकचा मुलगा असदला 80 लाख रुपए दिले होते.

मिळालेल्या माहीतीनुसार, या पैशाचा उपयोग उमेश पाल हत्याकांडमध्ये केला गेला होता. बिल्डर मोहम्मद मुस्लिम ला धमकीच्या मेसेजमध्ये अतिकने म्हटले होते की, माझा कोणता मुलगा ना वकील बनेल ना डॉक्टर, फक्त हिशोब होईल. इंशाअल्लाह लवकरच हिशोब सुरु करेन असे म्हणत बिल्डरकडून 5 कोटी रुपयांची मागणी केली होती.

याशिवाय, निवडणुकीदरम्यान अतिक अहमद नेहमी वसूली करत होता. मोठे बिल्डर आणि व्यापाऱ्यांकडून निवडणूक लढण्यासाठी टॅक्स घेत होता. अतिक जेव्हा निवडणूक लढत असायचा तेव्हा गुंडा टॅक्स वसूली पावती जाहीर केली जात होती.

  • पावत्यांचे दोन प्रकार

बिल्डर आणि व्यावसायिकांना दोम प्रकारच्या वसूली पावत्या दिल्या जायच्या. या पावत्या गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या होत्या. गुलाबी रंगाच्या पावतीचा रेट 3 ते 5 लाख रुपए इतका तर पांढऱ्या पावतीचा रेट 5 लाखापेक्षा जास्त असायचा अशी माहीती मिळाली आहे.

दरम्यान, अतीक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येची एसआयईटी तपास करत आहे. एसआयईटी टीमने शाहगंज ठाण्यातून एफआयआरची कॉपी घेतली आहे. याबरोबरच, कॉल्वीन हॉस्पीटल आणि आजूबाजूच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे. आज अतीक आणि अशरफला कोर्टात घेऊन जाणाऱ्या पोलिस टीमचा जबाब नोंदवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT