Arvind Kejriwal

 

Dainik Gomantak 

देश

अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन

आदित्य जोशी

नवी दिल्ली : आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. त्यांनंतर त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली होती. त्यांचा अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आणि कोरोना चाचणी (Corona Test) करुन घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल हे आपच्या प्रचारासाठी डिसेंबरमध्ये गोव्यातही येऊन गेले आहेत. गोव्यातही सध्या कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान गेल्या आठवड्याभरात अनेक नेत्यांसह सेलिब्रिटींनाही कोरोनाची (Corona) लागण झाली आहे, यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूलचे खासदार लुईझिन फालेरो, डेरिक ओब्रायन यांच्यासह अभिनेत्री नोरा फतेही आणि अभिनेता अर्जुन कपूरलाही (Arjun Kapoor) कोरोनाची लागण झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

SCROLL FOR NEXT