Chief Minister of Delhi Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

'लोकशाहीचा आदर करा सर'; थेट नायब राज्यपालांवर संतापले अरविंद केजरीवाल

Delhi: लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी मुख्य सचिवांसह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत कोरोनाची परिस्थिती आणि तयारीवर बैठक घेतल्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपराज्यपाल अनिल बैजल (Anil Baijal) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. उपराज्यपालांच्या बैठकीवर भडकलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, "निवडलेल्या सरकारला बाजूला ठेऊन अशी समांतर बैठक घेणे हे संविधानाच्या विरोधात आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाच्या निर्णयाविरोधात आहे. ही लोकशाही आहे. जनतेने मंत्रिमंडळ निवडलेले आहे. तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही तुमच्या मंत्र्यांना विचारा. अधिकाऱ्यांशी थेट बैठका घेणे टाळा. लोकशाहीचा आदर करा सर.” असे ट्विट करत आपला राग व्यक्त केला. (Arvind Kejriwal lashed out at Lt Governor Anil Baijal, saying, "Respect democracy.")

दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी मुख्य सचिवांसह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत कोरोनाची परिस्थिती आणि तयारी यावर बैठक घेतली. त्या बैठकीनंतर केजरीवाल यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. यापुर्वी देखील प्रशासनात हस्तक्षेप करण्यावरुन केजरीवाल आणि उपराज्यपाल यांच्यात संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी ट्वीट करत, ‘मुख्य सचिव, एसीएस (गृह आणि आरोग्य), विभागीय आयुक्त, आरोग्य सचिव, डीएमआरसीचे एमडी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत कोरोनाची परिस्थिती आणि भविष्यातील तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठ
क घेतली' असल्याची माहिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT