Telangana  Dainik Gomantak
देश

Viral Video: 50 लोकांनी घरात घुसून केले डॉक्टर महिलेचे अपहरण; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

एका व्यक्तीला घराबाहेर ओढतांना आणि लाठ्या-रॉडने मारहाण करताना दिसत आहेत.

Pramod Yadav

तेलंगणमधून एक घटना समोर आली आहे. हैद्राबादमध्ये सुमारे 50 पुरुषांच्या जमावाने बळजबरीने घरात घुसून तेलंगणातील एका 24 वर्षीय महिलेचे अपहरण केले. ही महिला डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेंचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी एक तास केलेल्या ऑपरेशननंतर महिलेची सुटका करण्यात आली आहे.

हैदराबादजवळील आदिबाटला गावात ही घटना घडली. 50 पुरुषांच्या जमावाने महिलेच्या घरातून अपहरण करण्यात आले. वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सुमारे 100 तरुण त्यांच्या घरात घुसले आणि वैशाली यांना जबरदस्तीने घेऊन गेले, असा आरोप महिलेच्या पालकांनी केला आहे. व्हिडीओमध्ये किमान 30 लोक घराची तोडफोड करताना, कारच्या काचा फोडताना तसेच, एका व्यक्तीला घराबाहेर ओढतांना आणि लाठ्या-रॉडने मारहाण करताना दिसत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी वैशाली यांच्या पालकांशी बोलून याबाबत माहिती घेतली आहे. आयपीसी कलम 307 आणि धमकावण्याशी संबंधित इतर कलमांखाली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नक्कीच एक गंभीर गुन्हा असून, पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती रचकोंडा आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर बाबू यांनी दिली.

दरम्यान, वैशालीच्या कुटुंबियांनी नवीन रेड्डी नावाच्या एका व्यक्तीवर याबाबत आरोप केला आहे. नवीन तिच्याशी लग्न करण्यासाठी वैशालीला त्रास देत होता. यातूनच तिचे अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT