NABARD Nabcons Recruitment Dainik Gomantak
देश

NABARD Nabcons Recruitment 2021: 86 पदांसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) च्या मालकीच्या सहाय्यक नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Nabcons) 86 रिक्त पदे भरणार आहे.

दैनिक गोमन्तक

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) च्या मालकीच्या सहाय्यक नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (Nabcons) वरिष्ठ व मध्यम-स्तरीय सल्लागार तसेच फिल्ड एन्युमरेटर भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. या भरती मोहिमेमध्ये नाबार्डच्या कृषी क्षेत्र विकास विभागांतर्गत “आदिवासी विकास प्रकल्प” हाताळण्यासाठी 86 रिक्त पदे आणि 24 क्षेत्रीय कार्यालये व मुख्यालय, मुंबई येथे भरली जाणार आहे. इच्छूक उमेदवार Nabcons च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 10 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात www.nabcons.com. (Apply for NABARD Nabcons Recruitment 2021)

नॅबकॉन्स ही नाबार्डची संपूर्ण मालकीची कंपनी आहे आणि कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रातली एक प्रमुख सल्लागार संस्था आहे. या लिंकवर जावून http://www.nabcons.com/ तुम्ही जाहीरातीचे नोटिफिकेशन बघू शकता.

  1. वरिष्ठ पातळी सल्लागार: 2 पोस्ट

  2. मध्यम-स्तरीय सल्लागार: 21 पोस्ट

  3. एन्युमरेटर: 63 पोस्ट

पात्रता

  1. वरिष्ठ पातळी सल्लागाराला 2 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले पदव्युत्तर पदवी / डॉक्टरेट असावे किंवा 4 वर्षाहून अधिक अनुभव असावा.

  2. मध्यम-स्तरीय सल्लागार पदासाठी पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट असणे आवश्यक आहे परंतु कमीतकमी 1 वर्षाचा अनुभव असावा

  3. फील्ड एन्युमरेटरला किमान 1-2 वर्षाचा अनुभव असणे आणि पदवीधर असणे गरजेचं आहे.

वय मर्यादा

  • वरिष्ठ पातळी सल्लागाराचे वय किमान 24 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असावे

  • मध्यम-स्तरीय सल्लागाराचे वय किमान 24 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असावे.

  • फील्ड एन्युमरेटर - किमान वय 24 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे असावे.

या वेबसाइटवर जावून आपण अर्ज करू शकता

  • वरिष्ठ स्तर सल्लागार- https://forms.gle/e79TgsMVJ1cTn5xk7

  • मध्यम-स्तरीय सल्लागार https://forms.gle/cWPjoNK6z4msaA17A

  • फील्ड एन्युमरेटर - https://forms.gle/GUy2Hmk5fH77WKeS6

अशी असणार निवड प्रक्रिया

प्राप्त झालेले अर्ज शॉर्टलिस्टि केल्यानंतर नाबकॉन उमेदवारंना मुलाखतीसाठी बोलावतील. मुलाखत फेरीनंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कंपनीकडून कॉल लेटर प्राप्त होतील. कॉल आणि लेटरमध्ये नमूद केलेल्या जागेच्या आधारे त्यांना दुसर्‍या मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

असे असणार वेतन

  • वरिष्ठ स्तरीय सल्लागार - दरमहा 51,000 - 60,000 रुपये

  • मध्यम स्तरीय सल्लागार - दरमहा 41,000 - 50,000

  • फिल्ड एन्युमरेटर- दरमहा 20,000 - 25,000

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT